spot_img
अहमदनगर...आता माझी जबाबदारी; पारनेरकरांसमोर डॉ. सुजय विखे यांनी स्पष्ट शब्दात मांडले मत

…आता माझी जबाबदारी; पारनेरकरांसमोर डॉ. सुजय विखे यांनी स्पष्ट शब्दात मांडले मत

spot_img

निघोज । नगर सहयाद्री:-
शेतकरी कर्जमाफी आणि कांद्याच्या भाववाढीसाठी ‘आपली माती आपली माणसं’ या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रुपेश ढवण यांनी घेतलेली उपोषणाची भूमिका ही पूर्णपणे रास्त असून, त्यांच्या मागण्या केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी माझी आहे, असे स्पष्ट प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले आहे. कांदा उत्पादक शेतकरी आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत त्या सोडवण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. कर्जमाफी आणि योग्य भाव मिळणे हे शेतकऱ्यांचे मूलभूत हक्क असून त्यासाठी आवाज उठवणे गरजेचे आहे, असेही त्यांनी नमूद केले.

शेतकरी कर्जमाफी आणि कांद्याला भाव मिळावा या प्रमुख मागण्यांसाठी ‘आपली माती आपली माणसं’ या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रुपेश ढवण यांनी सुरु केलेले उपोषण गुरुवार, दि. २८ ऑगस्ट रोजी मागे घेण्यात आले. उपोषणस्थळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि आमदार काशिनाथ दाते यांनी भेट देत उपोषणकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी खासदार विखे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या केंद्र व राज्य सरकारकडे योग्य पद्धतीने मांडून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच आमदार काशिनाथ दाते यांनी लवकरच रुपेश ढवण यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांच्याकडे नेण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर उपोषन मागे घेण्यात आले. यावेळी रुपेश ढवण, महेंद्र पांढरकर, देवरामबुवा लामखडे (सामाजिक कार्यकर्ते), प्रगतीशील शेतकरी उत्तमराव लामखडे, पवन महाराज तनपुरे, मच्छिंद्र लंके, गणेश पवार, अशोक शेटे, लक्ष्मण शेटे, रामचंद्र महाराज सुपेकर (ज्येष्ठ मार्गदर्शक), भाऊसाहेब लामखडे, नाथाभाऊ काळे, राजूकाका देशपांडे, पत्रकार सुरेश खोसे पाटील आदी उपस्थित होते.

शेतकरी कर्जमाफी आणि कांद्याला हमीभाव मिळावा या दोन प्रमुख मागण्यांसाठी मागण्यांसाठी एक महिन्यापूर्वीही रुपेश ढवण यांनी पाच दिवसांचे अन्नत्याग आंदोलन केले होते. त्यावेळी राळेगण थेरपाळचे लोकनियुक्त सरपंच पंकजदादा कारखिले यांनी पुढाकार घेत आमदार दाते, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, दिपक लंके यांनी खासदार प्रतिनिधी म्हणून भेट दिली होती. त्यानंतर दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याने यावेळी नऊ दिवसांचे आमरण उपोषण पुन्हा हाती घेण्यात आले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, उपाध्यक्ष रखमाजी कापसे, भाजपचे तालुकाध्यक्ष राहुल शिंदे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा तालुकाध्यक्ष भास्कर उचाळे, माजी पंचायत समिती सदस्य दिनेश बाबर, सुप्याचे माजी सरपंच दत्ता नाना पवार, प्रकाश वाघ, संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशनचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील वराळ, भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष पंकज कारखिले, पारनेर तालुका पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष दत्तात्रय उनवणे, भाजप महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष सोनाली सालके, उपसरपंच ज्ञानेश्वर वरखडे, वैद्यकीय संघटनेचे डॉ. बाळासाहेब घोगरे, राष्ट्रवादी युवक तालुका उपाध्यक्ष शिवराज कदम, भास्करराव वराळ पाटील, अस्लमभाई इनामदार, आकाश वराळ, निवृत्ती वरखडे, सिताभाऊ कवडे मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष बाबाजी वाघमारे, पत्रकार आनंद भुकन, संपतराव वैरागर तसेच ग्रामस्थ, महिला बचत गटाच्या पदाधिकारी, वारकरी मंडळ, व्यापारी वर्ग आणि कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी सातत्याने लढा देणार: रुपेश ढवण
शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आपण सातत्याने आपला लढा शांततामय मार्गाने सुरू ठेवणार असून विखे पाटील व आमदार दाते सर हे केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकरी, कांदा उत्पादक शेतकरी यांना न्याय मिळवून देतील अशी अपेक्षा रुपेश ढवण यांनी व्यक्त करत रास्ता रोको, गाव बंद आंदोलनात सहभाग नोंदवनारे कांदा उत्पादक शेतकरी, व्यापारी असोसिएशन, वारकरी मंडळ, महिला भजणी मंडळाचे आभार मानले.

  • शेतकऱ्यांच्या लढ्याला धार्मिक-सांस्कृतिक पाठिंबा
    रुपेश ढवण व त्यांच्या सहकाऱ्यांनी जाहीर केलेल्या दहा दिवसांच्या उपोषण कार्यक्रमाला सामाजिकच नव्हे तर धार्मिक आणि सांस्कृतिक स्वरूपही लाभले. पहिल्या दिवसापासून रोज सायंकाळी नामांकित महाराजांचे प्रवचन, त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन, असे जनसहभागातून हे आंदोलन अधिक व्यापक आणि भावनिक झाले. शिरूर, पारनेर, पुणे, मुंबई, अहिल्यानगर परिसरातील शेतकऱ्याने मोठ्या संख्येने हजेरी लावली. सकाळी ११ वाजेपासून ते रात्री दहा वाजेपर्यंत निघोज, टाकळी हाजी, पांढरकरवाडी, पठारवाडी, शिनगरवाडी, वडनेर गावातील भजनी मंडळांनी भजने गात उपोषनाला पाठींबा दिला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

संगमनेर तापलं! आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला, बाजारपेठ बंद आणि महायुतीचा मोर्चा, मंत्री विखे पाटील काय म्हणाले, पहा..

संगमनेर । नगर सहयाद्री:- गेल्या काही दिवसांपासून संगमनेर तालुक्यातील राजकीय वातावरण आधीच तणावपूर्ण असताना,...

गुलाल घेतल्याशिवाय मागे हटणार नाही; आझाद मैदानावरून मनोज जरागेंची मोठी गर्जना!

मुंबई | नगर सह्याद्री राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मराठा...

रस्त्यावर अनधिकृत बांधकाम; 40 जणांविरुद्ध गुन्हा दाखल, अहिल्यानगर क्राईम वाचा एका क्लिकवर..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर येथील कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत सार्वजनिक रस्त्यावर अनधिकृतपणे भिंत...

रानात हत्येचा थरार! नवऱ्याचे बायकोवर धारदार शस्त्राने डझनभर वार, कारण काय?

Maharashtra Crime: परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील सोनपूर तांडा येथे पतीने पत्नीवर शेतामध्ये धारदार शस्त्राने...