पाच वर्षांपूर्वीची चूक सुधारण्याची संधी; काशीनाथ दाते यांचे प्रतिपादन | पारनेर येथे लाल चौकात कॉर्नर सभा
पारनेर | नगर सह्याद्री
माजी आमदार विजय औटी, नंदकुमार झावरे, वसंतराव झावरे यांच्यासोबत काम करण्याची मला संधी मिळाली. मला काम करण्याचा अनुभव आहे. पाच वर्षापूर्वीची चूक दुरुस्त करण्याची या निवडणुकीत संधी आहे. आपल्या तालुयाला सुसंस्कत राजकरणाचा वारसा आहे. ठराविक टोळी एमआयडीसीसीमध्ये उड्या मारत आहे. तेथील दादागिरी थांबवावी लागेल. ग्रामपंचायत सोसायायटीच्या निवडणुकीत हस्तक्षेप केला जात आहे. बाहेरची माणसे, टोळ्या पाठवून गावपातळीवरील राजकारणात हस्तक्षेप केला जात आहे. गावागावात घराघरात भांडणे लावून स्वतःची डाळ शिवजून घेणार्यांचा धंदा बंद करण्याची आता वेळ आली असल्याचे महायुतीच्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार काशीनाथ दाते यांनी सांगितले.
महायुतीचे उमेदवार काशीनाथ दाते यांचा उमेदवारी अर्ज मंगळवारी महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत निवडणूक निर्णय अधिकार्यांकडे सुपूर्द करण्यात आला. अर्ज दाखल करण्यापूर्वी पारनेर शहराच्या लाल चौकात झालेल्या कॉर्नर सभेत श्री. दाते हे बोलत होते. सभेनंतर मिरवणूकीने जात दाते यांनी अर्ज दाखल केला.
महायुतीमधील घटक पक्षाच्या पक्षाच्या तीनही पक्षाच्या टीमने केलेल्या सर्वेक्षणानुसार उमेदवारी निश्चित करण्यात आल्याचे श्री. दाते यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड, राष्ट्रवादी युवती प्रदेशाध्यक्षा संध्याताई सोनवणे, भाजप प्रदेश सदस्य विश्वनाथ कोरडे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष विक्रम कळमकर, भाजप तालुका अध्यक्ष राहुल शिंदे, लाडकी बहीण योजना समितीचे तालुकाध्यक्ष सुनील थोरात, भाजप महिला जिल्हाध्यक्षा अश्विनी थोरात, राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्षा सुषमा रावडे, जयश्रीताई शिंदे, मा. जि. प. सदस्य वसंत चेडे, माजी सभापती गणेश शेळके, सचिन वराळ, राजाराम एरंडे, अमोल रोकडे, विकास रोकडे, सुभाष दुधाडे, दत्ता पवार, अशोक चेडे, रामचंद्र मांडगे, सुरेश बोरुडे, दादा वारे, माजी पंचायत समिती सदस्य दिनेश बाबर, छबू कांडेकर, सरपंच लहू भालेकर, कृष्णाजी बडवे, विकास सावंत, राजेश गोपाळे, बाळासाहेब लामखडे, दत्ता आवारी, युवराज पाटील, अतुल सैद, शिवम पवार, अक्षय गोरडे आदी यावेळी उपस्थित होते.
खासदार नीलेश लंके यांची ङ्गमाझी लाडकी बायकोफ योजना
पारनेर-नगर विधानसभा मतदार संघामध्ये खासदार नीलेश लंकेंनी माझी लाडकी बायको योजना सुरु केली असून, तिचे निकष हे उमेदवार खासदाराची पत्नी असावी असे आहेत. यांना माझे कुटुंब माझी जबाबदारी एवढेच माहीत आहे. बायकोला निवडून आणण्यासाठी हे वाट्टेल ते करायला तयार आहेत. यावेळी महायुतीचे उमेदवार काशीनाथ दाते सरच घड्याळाच्या चिन्हावर निवडून येतील असा मला विश्वास आहे. – संध्या सोनवणे, प्रदेशाध्यक्षा, राष्ट्रवादी युवती कॉग्रेस महाराष्ट्र राज्य.
दोन वर्षांत ३०० कोटींचा निधी
तालुयाच्या विकासाची परंपरा विजय औटी हे आमदार असेपर्यंत सुरू होती. बांधकामचा सभापती म्हणून काम करण्याची संधी मिळाल्यानंतर संपूर्ण तालुयात विकास कामे केली. मला दोन वर्षांसाठी एक पद मिळाले. २०० ते ३०० कोटी रूपयांचा निधी तालुयासाठी खेचून आणला. पाच वर्षांत हे कौशल्य कोणीही वापरले नसल्याचे दाते यांनी सांगितले.