spot_img
अहमदनगरआता प्रत्येक तालुक्याला भाजपचे तीन अध्यक्ष; निवडीकडे लागले सर्वांचे लक्ष

आता प्रत्येक तालुक्याला भाजपचे तीन अध्यक्ष; निवडीकडे लागले सर्वांचे लक्ष

spot_img

अहिल्यानगर | नगर सह्याद्री
भारतीय जनता पक्षाची संघटना मजबूत करण्यासाठी आणि पक्ष वाढीसाठी आता प्रत्येक तालुक्यात तीन मंडल अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. पक्षवाढीसाठी आणि कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय भाजपने घेतला आहे. येत्या दोन दिवसांत तालुकाध्यक्षांच्या निवडी जाहीर होणार असल्याने या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भाजप पक्षांतर्गत तालुकाध्यक्ष, शहर अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष यांच्या निवडी होणार आहेत. या निवडीसाठी निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. ते स्थानिक आमदार, खासदार, पक्षाचे पदाधिकारी, सदस्य यांच्याशी चर्चा करून पक्ष वाढीसाठी योगदान असणाऱ्या सक्रीय सदस्यांची पदावर वण लावणार आहेत. येत्या दोन दिवसांत अहिल्यानगर जिल्ह्यातील भाजप तालुका अध्यक्षांच्या निवडी जाहीर होणार आहेत.

अहिल्यानगर दक्षिणमध्ये 22 मंडल अध्यक्षांच्या निवडी होणार असून प्रत्येक तालुक्याला तीन तालुका अध्यक्ष मिळणार आहेत. दोन गटांत एक तालुका अध्यक्षाची निवड केली जाणार आहे. या निवडीमुळे पक्षाची ध्येय धोरणे तळागाळातील नागरिकांपर्यत पोहोचणे सहज शक्य होणार आहे. त्यामुळे पक्षवाढीसाठी भाजपला याचा नक्कीच फायदा होणार असल्याचे जिल्हा सरचिटणीस संतोष म्हस्के यांनी सांगितले.

पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारणार; तालुकाध्यक्ष दीपक कार्ले
गेल्या दीड वर्षापूव तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी पक्षाने माझ्यावर दिली. भाजपा नेते मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा आमदार शिवाजीराव कर्डिले, डॉ. सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून नगर तालुक्यात पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले. आता पुन्हा तालुकाध्यक्ष पदाच्या निवडी होणार आहेत. आगामी काळातही पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारणार असल्याचे भाजपा तालुकाध्यक्ष दीपक कार्ले यांनी सांगितले.

भाजपचे जिल्हाध्यक्ष 25 एप्रिल पर्यंत निवडणार
भाजपच्या संघटनपर्व सदस्य नोंदणी अभियानांतर्गत नगर जिल्ह्यातील उत्तर नगर, दक्षिण नगर व नगर शहर महानगर जिल्हाध्यक्ष अशा तीनही पदाधिकाऱ्यांच्या निवडी 15 ते 25 एप्रिल दरम्यान होणार आहेत. प्रदेश सरचिटणीस विजयराव चौधरी व विभाग संघटनमंत्री रवी अनासपुरे यांच्या उपस्थितीत जिल्हा भाजपच्या संघटन पर्व सदस्यनोंदणी अभियानाचा आढावा नगरमध्ये घेण्यात आला. यावेळी नगर शहर व परिसरातील नगर शहर, मध्य नगर शहर, भिंगार व केडगाव या चारही मंडलांची पदाधिकारी निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...