spot_img
ब्रेकिंगAhmednagar News पोलिसांची घरेच सुरक्षित नाहीत तर नागरिकांच्या सुरक्षेचे काय? चोर्‍यांच्या प्रश्नावरून...

Ahmednagar News पोलिसांची घरेच सुरक्षित नाहीत तर नागरिकांच्या सुरक्षेचे काय? चोर्‍यांच्या प्रश्नावरून काळेंचा संतप्त सवाल

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री
मागील काही दिवसांपासून नगर शहरामध्ये चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. पूर्वी रात्री चोर्‍या व्हायच्या. आता तर दिवसाढवळ्या होऊ लागल्या आहेत. तीन दिवसांपूर्वी शहराच्या सावेडी उपनगरातील एका बिल्डिंगमध्ये दिवसाच्या वेळी एकाच वेळी एकाच मजल्यावरील तीन घरांमध्ये चोरी करत चोरट्यांनी पैसे, दागिने यासह ऐवज लंपास केला. एवढेच नाही तर काल पोलीस उपनिरीक्षक गणेश वारुळे यांच्या केडगाव उपनगरातील सोनेवाडी रस्त्यावर असणार्‍या घरात देखील दिवसाढवळ्या चोरट्यांनी चोरी करत दागिने लंपास केल्याची घटना समोर आली आहे.

याबाबत शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना निवेदन पाठविले आहे. पोलिसांची घरच सुरक्षित नाहीत, तर सर्व सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचे काय ? असा संतप्त सवाल काळे यांनी निवेदनाद्वारे उपस्थित केला आहे. काळे यांनी निवेदनात पुढे म्हटले आहे की, पोलीस उपनिरीक्षक वारूळे यांच्या घरी चोरी करणारे चोर सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहेत.

जर पोलीसांची घरच चोरट्यां पासून सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य नागरिकांनी सुरक्षेची पोलीस प्रशासनाकडून काय अपेक्षा बाळगावी असा प्रश्न निर्माण झाला आहे. चोरी करणार्‍या गुन्हेगारांचे पोलिसांकडे ट्रॅक रेकॉर्ड उपलब्ध आहे. सराईत चोरट्यांवर पोलिसांनी घडलेल्या घटनांच्या अनुषंगाने जरब निर्माण केली पाहिजे. तसेच जे गुन्हेगार अद्यापही पोलिसांच्या रेकॉर्डवर आलेले नाहीत अशांचा शोध घेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करून जरब निर्माण केली पाहिजे.

काळे यांनी पुढे म्हटले आहे, चोरी करणार्‍या गुन्हेगारांना अटक करून त्यांच्याकडून नागरिकांचा चोरी गेलेला मुद्देमाल हस्तगत करत परत तो नागरिकांना मिळवून दिला पाहिजे. चोरट्यांमध्ये पोलिसांचा धाक निर्माण झाला पाहिजे. सर्वसामान्य नागरिक आणि त्यांच्या घरांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी ही पोलीस प्रशासनाची आहे. त्यामुळे पोलिसांनी या बाबतीमध्ये कठोर पाऊले उचलावीत.

गस्त वाढविण्याची मागणी
शहर पोलीस उपाधीक्षकांसह शहर हद्दीतील सर्व पोलीस स्टेशनच्या निरीक्षकांना याबाबतीत आदेश करत प्रतिबंधात्मक उपाययोजनां बाबत पाऊले उचलावीत. रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे किरण काळे यांनी केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरमध्ये गटशिक्षणधिकारी कार्यालयाचे कारनामे उजेडात!

शिक्षकांकडून गंभीर तक्रारी | गटशिक्षणाधिकार्‍यांवर कारवाईसाठी शिक्षक संघटना सरसावल्या अहिल्यानगर । नगर सहयाद्री भ्रष्टाचार, आर्थिक...

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक : तीन टप्प्यात मतदान, पुढील आठवड्यात घोषणा

दुसर्‍या टप्प्यात झेडपी, पंचायत समिती, महापालिका निवडणूक शेवटच्या टप्प्यात मुंबई | नगर सह्याद्री प्रभाग रचना, इतर...

‘तुम्ही डिजिटल अरेस्ट झालात!, सावेडीतील इंजिनीअला ९ लाखाला गंडवले, वाचा नगर क्राईम

अहिल्यानगर |  नगर सहयाद्री मुंबई सायबर सेलच्या नावाने व्हीडीओ कॉल करून, ‘अवैध पार्सल’चा बनाव...

हे घ्या पुरावा! राज ठाकरेंनी आकडे नाही तर मतदार याद्यांचा ठीग दाखवला…, कोण काय म्हणाले पहा

मुंबई / नगर सह्याद्री - मतदार याद्यांमधील घोळ आणि कथित मतचोरीच्या आरोपासंदर्भात निडणूक आयोगाला...