spot_img
महाराष्ट्रनुसती विधानपरिषद नको, तर कॅबिनेट मंत्रीपदच हवं; लक्ष्मण हाके नेमकं काय म्हणाले...

नुसती विधानपरिषद नको, तर कॅबिनेट मंत्रीपदच हवं; लक्ष्मण हाके नेमकं काय म्हणाले पहा

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री –
विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा विजय झाला. महाविकास आघाडीचा राज्यात सुपडासाफ केला. तब्बल २३६ जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून आले. या विजयानंतर आता राज्यात राजकीय हालचाली वेगाने होत आहेत. महायुतीकडून सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आला असून, मुख्यमंत्रि‍पदाची शर्यतही अटातटीची झाली आहे.

महायुतीसह दिल्लीतील केंद्रीय नेतृत्वातही खल सुरू आहे. त्याचवेळी महाराष्ट्रात ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी महायुतीकडे मोठी मागणी केली आहे. ‘नुसती विधानपरिषद नको, तर कॅबिनेट मंत्रिपदच हवं.’, अशी थेट मागणी त्यांनी केली आहे.

पुण्यामध्ये लक्ष्मण हाके यांनी साम टीव्हीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका करत निशाणा साधला. त्यांनी सांगितले की, ‘जरांगेंना लोक कंटाळले आहेत. १३० जागा पाडायची भाषा केली होती त्यांनी. जिथं मेसेज दिला तिथं लोक मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. जरांगे खोटं बोलत आहे. पण मी जिथं सभा घेतल्या तिकडच्या उमेदवारांना चांगली मतं पडली आहेत.’

लक्ष्मण हाके म्हणाले की, जरांगे काहीही बोलत आहेत. आम्ही राजेश टोपेंना पाडलं. लबाड माणूस आहे. निवडणूक निकाल ही जरांगेंना चपराक आहे. आम्ही ओबीसीला जवळचे मानणारी माणसे आहोत तसेच महायुतीची सुपारी घेतल्याचे जरांगे जाहीरपणे बोलले होते. बाप्पा सोनवणे निवडून आले तेव्हा तेही म्हणत होते की जरांगेमुळे निवडून आलो.’

गृहमंत्री, अर्थमंत्री करायला हवं – हाके
लक्ष्मण हाके म्हणाले की, ‘मला विधानपरिषदच काय, कॅबिनेट मंत्रिपद हवंय. गृहमंत्री, अर्थमंत्री किंवा केंद्रात काय तर द्यायला हवं. अर्ध्या समाजाचे प्रतिनिधित्व मी करतोय.’ दरम्यान, लक्ष्मण हाके यांनी केलेली मागणी आता महायुती पूर्ण करते की नाही हे येत्या काही दिवसांत कळेल.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बॉम्बस्फोट नक्की कोणी घडवला?; सरकारला उत्तर द्यावेच लागणार…

विशेष संपादकीय । शिवाजी शिर्के:- मुंबईतील साखळी बाँब स्फोटातील सर्व आरोपींना निर्दोष सोडल्यानंतर राज्य आणि...

नगर तालुका क्रीडा समितीच्या अध्यक्षपदी ‘महेंद्र हिंगे’

उपाध्यक्षपदी दीपक दरेकर, भगवान मते, नाना डोंगरे तर सचिवपदी हंबर्डे अहिल्यानगर | नगर सह्याद्री अहिल्यानगर तालुका...

तारकपूरला चोरट्यांचा डल्ला; दीड लाखाचा मुद्देमाल लंपास

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- तारकपूर परिसरात चोरट्यांनी घरात डल्ला मारुन तब्बल दीड लाखांचा मुद्देमाल लांबविला...

पारनेर तालुक्यातील ‌’या‌’ ५४ गावांचा डोंगरी विभागात समावेश!

सुपा । नगर सहयाद्री:- राज्य सरकारने जाहीर केलेल्या सुधारित यादीनुसार पारनेर तालुक्यातील 54 गावांचा...