spot_img
देश‘सर्व हिंदू मोदी समर्थक नाहीत’, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडोंचे विधान; नेमकं काय...

‘सर्व हिंदू मोदी समर्थक नाहीत’, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडोंचे विधान; नेमकं काय म्हणाले पहा…

spot_img

नवी दिल्ली / वृत्तसंस्था :
कॅनडामध्ये खलिस्तानी कट्टरपंथी उपस्थित असून त्यांच्याकडून भारताला लक्ष्य केले जात असल्याचा आरोप भारताकडून अनेकदा करण्यात आला होता. मात्र कॅनडाने हा दावा नेहमीच फेटाळून लावला. त्यानंतर आता पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी कॅनडाच्या भूमीत खलिस्तान्यांचा वावर असल्याचे कबूल केले आहे. “कॅनडामध्ये खलिस्तानी आहेत, पण ते सर्व शीख समुदायाचे प्रतिनिधित्व करत नाहीत. तसेच कॅनडात पंतप्रधान मोदींचेही हिंदू समर्थक आहेत, पण ते सर्व हिंदू समाजाचे प्रतिनिधित्व करत नाहीत”, असे पंतप्रधान ट्रुडो म्हणाले.

दिवाळीनिमित्त आयोजित केलेल्या एका समारंभात बोलत असताना पंतप्रधान ट्रुडो म्हणाले की, खलिस्तान्यांचे अनेक समर्थक कॅनडात आहेत. पण ते सर्व शीख समाजाचे प्रतिनिधित्व करत नाहीत. तसेच कॅनडात पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही समर्थक आहेत, तेही सर्व जण हिंदू समाजाचे प्रतिनिधित्व करत नाहीत.

खलिस्तानी अतिरेकी हरदीपसिंग निज्जर यांच्या हत्येनंतर भारत आणि कॅनडात तणाव निर्माण झालेला आहे. त्या पार्श्वभूमीवर ट्रुडो यांचे विधान महत्त्वाचे मानले जाते. सप्टेंबर २०२३ मध्ये हरदीपसिंग निज्जरच्या हत्येमध्ये भारतीय गुप्तहेरांचा सहभाग असल्याचा आरोप ट्रुडो यांनी केला होता. त्यानंतर भारत आणि कॅनडामध्ये तणावाचे संबंध निर्माण होत गेले.

भारताने निज्जरला दहशतवादी घोषित करून त्याच्या अटकेची मागणी केली होती. १८ जून २०२३ रोजी ब्रिटिश कोलंबिया येथील एका गुरुद्वाराबाहेर निज्जरची हत्या करण्यात आली होती.

मागच्या महिन्यात कॅनडाने निज्जरच्या हत्येची चौकशी करत असताना भारतीय उच्चायुक्तांवर ठपका ठेवला. उच्चायुक्तांना निज्जरच्या हत्येत रस होता, असा आरोप कॅनडाने केल्यामुळे भारताने नाराजी व्यक्त केली. तसेच आपले सर्व राजनैतिक अधिकारी कॅनडातून माघारी बोलविण्यात आले. तसेच कॅनडाच्या सहा राजनैतिक अधिकाऱ्यांनाही देशाबाहेर काढण्यात आले.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने वारंवार सांगितले की, कॅनडाच्या सरकारने निज्जरच्या हत्येमध्ये भारताच्या सहभागाबद्दलचे पुरावे दिलेले नाहीत. ट्रुडो हे आगामी निवडणुकीसाठी मतपेटीचे राजकारण करत असल्याचाही त्यांच्यावर आरोप होत आहे. त्यामुळेच ते कॅनडाच्या भूमीवरील फुटीरतावादी घटकांचा सामना करण्यास अपयशी टरत आहेत, अशीही टीका त्यांच्यावर होत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राष्ट्रवादी सोडून सुनीता भांगरे भाजपात; जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे समीकरण जुळले

अकोले । नगर सहयाद्री आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोले तालुक्यातील सुनीता भांगरे यांनी...

खळबळजनक! पेरूच्या बागेत आढळला युवकाचा मृतदेह, नेमकं काय घडलं?

अहिल्यानगर। नगर सहयाद्री साकुरी शिवारात मंगळवारी सकाळी राहाता येथील युवकाचा पेरूच्या बागेच्या शेडमध्ये मृतदेह...

‘मोंथा’ चक्रीवादळ महाराष्ट्राला देणार तडाखा! राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, अनेक जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट

मुंबई | नगर सहयाद्री राज्यात ‘ऑक्टोबर हिट’मुळे तापमान वाढले असताना आता हवामानात अचानक बदल होण्याची...

आजचे राशी भविष्य! आज ‘या’ राशींना आश्चर्याचा सुखद धक्का बसणार, वाचा, तुमचे राशी भविष्य!

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्यपैश्याची कमतरता आज घरात कलहाचे कारण बनू शकते...