मुंबई । नगर सहयाद्री:-
नथुराम गोडसेचे नाव घेत धमकी देणाऱ्या संग्रामबापू भंडारे यांच्या विरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे. ‘ज्या व्यक्तीच्या मुखात आपसूक नथुराम’जी’ गोडसे असा उल्लेख येतो, त्याला ‘हिंदुत्ववादी’ नव्हे दहशतवादीच म्हणायला पाहिजे’, असा हल्लाबोल काँग्रेसच प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
सोशल मीडियावर पोस्ट करत सपकाळ म्हटले आहे की, ‘आपल्या संत परंपरेला सोडून राजकीय प्रचार करणाऱ्या दलालासारखी आणि एखाद्या गावगुंडासारखी भाषा वापरणाऱ्या या समाजकंटकांना महाराज आणि कीर्तनकार म्हणजे आपल्या थोर संतपरंपरेचा अपमान आहे.’
‘आजपर्यंत कोणत्या संत-महात्म्याने जीवे मारण्याची धमकी दिली? याचाच अर्थ हे वारकरी संप्रदायात घुसलेले नकली वारकरी आहेत, जे समाजात द्वेषाचं विष पेरून एका विशिष्ट राजकीय विचारधारेसाठी सुपाऱ्या वाजवण्याचं काम करतात.’, असा आरोप देखील सपकाळ यांनी केला.