spot_img
ब्रेकिंगशेतात कांदे नाही, ‘गांजा’ सापडला! शेतमालक फरार, असा टाकला पोलिसांनी छापा..

शेतात कांदे नाही, ‘गांजा’ सापडला! शेतमालक फरार, असा टाकला पोलिसांनी छापा..

spot_img

जामखेड । नगर सहयाद्री
जामखेड पोलिसांनी कर्जत तालुक्यातील रत्नापुर येथील एका शेतातून तब्बल २८ किलो ३० ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या प्रकरणात दोन जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, शेतमालक विजय ढवळे फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

९ ऑक्टोबर रोजी अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जामखेडमधील गोरोबा टॉकीजजवळ राहणाऱ्या नितीन उर्फ कव्या धनसिंग पवार (४२) आणि निशा नितीन पवार (३२) यांच्या घरावर छापा टाकून अडीच किलो गांजा जप्त केला होता. या प्रकरणात शामसुंदर अंकुश जाधव यांनी फिर्याद दिली होती.

दोन्ही आरोपींना तीन दिवसांची पोलिस कोठडी मिळाल्यानंतर त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता, त्यांनी रत्नापुर येथील विजय अशोक ढवळे यांच्या शेतात गांजाची लागवड केली असल्याची माहिती दिली. त्यानुसार, ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, पोउनि किशोर गावडे, पो.हे.कॉ. तुकाराम सोनवणे, पो.कॉ. ईश्वर माने, पोकों भागीरथ देशमाने व योगेश दळवी यांच्या पथकाने ढवळे यांच्या शेतावर छापा टाकला.

छाप्यात २८ किलो ३० ग्रॅम वजनाची गांजाची झाडे आढळून आली आहे. सदर शेतमालक विजय ढवळे सध्या फरार असून त्याचा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अजितदादांना मोठा धक्का! ‘हा’ आमदार भाजपच्या वाटेवर? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

मुंबई / नगर सह्याद्री : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. अहिल्यानगरचे राष्ट्रवादी काँग्रेस...

आरक्षणामुळे कही खुशी कही गम; जिल्हा परिषद पंचायत समिती गट-गणातील आरक्षण जाहीर

जिल्हा परिषद पंचायत समिती गट-गणातील आरक्षण जाहीर | स्थानिक राजकारणात होणार उलथापालथ अहिल्यानगर ।...

पारनेर पंचायत समिती गणाचे आरक्षण जाहीर

पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर तालुक्यातील पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षण सोडत नुकतीच जाहीर झाली...

खासदार संजय राऊतांची प्रकृती बिघडली; तातडीने फोर्टिस रुग्णालयात दाखल

MP Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे....