spot_img
ब्रेकिंगकल्याणी नगर अपघात प्रकरण: पोलीस आयुक्ताचे मोठे विधान

कल्याणी नगर अपघात प्रकरण: पोलीस आयुक्ताचे मोठे विधान

spot_img

पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांचा दावा
पुणे | नगर सह्याद्री
कल्याणी नगर परिसरात घडलेल्या घटनेत दरदोज धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. या अपघात प्रकरणात अल्पवयीन आरोपीची ब्लड रिपोर्टची गरज नाही, आरोपी पूर्णपणे शुद्धीवर होता असा दावा पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी केला आहे. तसेच आरोपीवर कठोर कारवाईसाठी पुरावे गोळा केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

पोर्श कार अपघात प्रकरणात मुलाची १४ दिवस न्यायालयीन कोठडीत रवानगी, तर वडील विशाल अग्रवाल यांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान, गुरुवारी मुलाचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल आणि गाडीचा चालक गंगाधाम यांना गुन्हे शाखेत बोलावण्यात आले होते. त्यांच्याकडून घटनाक्रमाची माहिती घेण्यात आली. त्यांनी दिलेली माहिती आणि अपघाताची घटना यांचा ताळमेळ घालण्यात येत आहे.तो ज्या बारमध्ये दारूपित होता त्या बारच्या मालकालाही अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणात पोलीस अल्पवयीन आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात अल्पवयीन आरोपीने दारू प्यायली होती की नाही हे देखील मान्य केले नाही. या प्रकरणात आरोपीची रक्ताचा तपास का केला गेला नाही असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. यावर आता पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

वृत्तवाहिनीशी बोलतांना, अमितेश कुमार यांनी सांगितले,’ या प्रकरणात रक्ताच्या अहवालाने फारसा फरक पडत नाही. आरोपी पूर्ण शुद्धीत होता, दारू पिऊन गाडी चालवली तर लोकांचा जीवही जाऊ शकतो याची त्याला जाणीव होती. त्यांनी पुन्हा एकदा आपल्या मुद्याचा पुनरुच्चार केला असून याप्रकरणी कठोर कारवाईसाठी सर्व पुरावे गोळा केले जात असल्याचे सांगितले.’या प्रकरणात सुरुवातीला अल्पवयीन आरोपीला कोणत्या आधारावर जामीन देण्यात आला, हाही वादाचा विषय बनला होता.

आरोपींना ३०० शब्दांचा निबंध लिहावा लागेल, असे सांगण्यात आले. या निर्णयाबाबत देशभरात संताप व्यक्त होत असून पोलिसांवरही अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे. मात्र १५ तासांनंतर एकीकडे आरोपीला बाल न्याय मंडळाकडे ५ जूनपर्यंत निरीक्षणासाठी पाठवण्यात आले असताना तेच पोलीस आता कडक कारवाई करणार आहे.

तत्पूर्वी, आमदार रवींद्र धंगेकरांनी याप्रकरणी एक सविस्तर ट्विट केले आहे. ते म्हणतात, ज्याने आमच्या पुण्यनगरीची इतकी बदनामी झाली, असा पोलीस आयुक्त आम्हाला नको. कल्याणीनगर अपघातात अगोदर जामीन मिळालेल्या मुलाला १४ दिवसांची रिमांड होमची कस्टडी मिळाली. हे आम्ही दिलेल्या लढ्याला मिळालेले पहिले यश आहे. आपण सर्वांनी जर आवाज उठवला नसता, तर हे प्रकरण दाबले गेले असते.

त्या अधिकार्‍यांवर कारवाई होईल
आरोपीला काही विशेष सुविधा देण्यात आली किंवा काही खाद्यपदार्थ देण्यात आले याबाबत पुरावे मिळालेले नाहीत. तरी आम्ही याप्रकरणी तपास करत आहोत. कलम ३०४ लावण्यास उशीर का झाला याची चौकशी सुरु आहे. पण, कोणाचा आमच्यावर दबाब आहे असं म्हणणं योग्य नाही, असं आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. ड्रायव्हर बदलण्याचा प्रयत्न झाला हे सत्य आहे. आमदार सुनिल टिंगरे हे पोलीस स्टेशनमध्ये आले होते हे सत्य आहे. सुरुवातीला थोडी दिरंगाई झाली हे सत्य आहे. घटनाक्रम कळताच कलम ३०४ लावण्यात आले आहे. त्या रात्रीचे सर्व सीसीटीव्ही आमच्याकडे आहेत. गुन्हे शाखेकडून युद्ध पातळीवर तपास सुरु आहे. पार्टीमध्ये १० ते १२ जण होते. अपघातावेळी कारमध्ये चारजण होते. काही निष्काळजीपणा आणि दोष येरवाड्याच्या पोलीस अधिकार्‍यांनी केला आहे. त्यांच्यावर कारवाई होईल, असे त्यांनी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पुढचे ५ दिवस महत्वाचे, पावसाचा जोर वाढणर; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

मुंबई | नगर सहयाद्री राज्यात पावसाचा जोर वाढत असून पुढचे पाच दिवस हवामानाच्या दृष्टीने...

नगर जिल्ह्यातील दिंडी सोहळ्याला पिकअपची धडक; वारकरी जखमी

अहिल्यानगर । नगर सहयाद्री राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथून पंढरपूरकडे जाणार्‍या श्री दत्त सेवा पायी दिंडीच्या...

बागेश्वर धाममध्ये मोठी दुर्घटना; आरतीनंतर नेमकं काय घडलं?

Bageshwar Dham: मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील गढा गावात असलेल्या बागेश्वर धाम याठिकाणी एक मोठी...

तारण ठेवलेले सोने हेल्परने चोरले!, संधी मिळेल तेव्हा टाकायचा डाव..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री ग्राहकांनी तारण ठेवलेले लाखोंचे सोने हेल्परनेच चोरून नेल्याची धक्कादायक घटना...