spot_img
अहमदनगरभातोडी सरपंचावर अविश्वास ठराव मंजूर; तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली प्रक्रिया पूर्ण

भातोडी सरपंचावर अविश्वास ठराव मंजूर; तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली प्रक्रिया पूर्ण

spot_img

नऊ पैकी सात मते अविश्वासाच्या बाजूने 
अहिल्यानगर | नगर सह्याद्री:-
कामाचा गैरवापर व पदाचा अनियमित वापर करून शासकीय कामाचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत भातोडी गावच्या सरपंच सौ. ज्योती विक्रम लबडे यांच्यावर ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठराव आणला आहे. एकूण 9 पैकी 7 सदस्यांनी अविश्वासाच्या बाजूने मतदान केले आहे.

अहिल्यानगरचे तहसीलदार संजय शिंदे यांच्यासमोर ही सर्व प्रक्रिया पार पडली. सरपंच सौ. ज्योती विक्रम लबडे यांच्या विरोधात अविश्वास ठराव 16 जानेवारीला तहसीलदार कडे दाखल केला होता.उपसरपंच राजू पटेल, ग्रामपंचायत सदस्य सुभाष घमाजी कचरे, सुनिता विक्रम गायकवाड, सुनिता जालिंदर लबडे, कैलास कुशाबा गांगर्डे, मुमताज शाकीर मुलानी, उल्फत युनुस पटेल या 7 सदस्यांनी विश्वास ठरावाच्या बाजूने स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

महिला सरपंच असल्याने एकूण 9 पैकी 7 सदस्यांनी अविश्वास ठरावावर स्वाक्षरी केले असल्याने ठराव मंजूर करण्यात आला आहे. ग्रामपंचायत कारभार करताना सदस्यांना सरपंच ज्योती लबडे या कोणत्याही कामाबाबत विश्वासात घेत नव्हत्या. यामुळे आम्ही सर्वजण अविश्वास ठरावाच्या बाजूने आहोत असे सदस्यांनी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

फडणवीसांचा ठाकरेंना दणका, 35 नेत्यांचा राजीनामा, पहा काय घडलं

मुंबई / नगर सह्याद्री - विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत....

वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या, ‘तो’ व्हिडीओ आला समोर

बीड / नगर सह्याद्री - संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याचे पाय...

‌‘त्या‌’ लाडक्या बहिणींंना पैसे परत करावे लागणार! कारण आलं समोर..

मुंबई | नगर सह्याद्री महायुती सरकारला पुन्हा एकदा सत्तेत आणण्यासाठी गेम चेंजर ठरलेल्या लाडकी बहीण...

सिद्धिबाग शॉपिंग कॉम्प्लेक्सचे 11 लाख वसूल; उपायुक्त म्हणाले, माफीचा लाभ घ्या,अन्यथा…

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- महानगरपालिकेच्या वतीने कर वसुलीसाठी जोरदार मोहीम हाती घेतले असून आयुक्त यशवंत...