spot_img
ब्रेकिंगभीषण अपघातात नऊ जण ठार; सहा जण जखमी; भरधाव मोटारीची टेम्पोला धडक

भीषण अपघातात नऊ जण ठार; सहा जण जखमी; भरधाव मोटारीची टेम्पोला धडक

spot_img

पुणे / नगर सह्याद्री :
जेजुरी-मोरगाव रस्त्यावर भरधाव मोटारीने टेम्पोला धडक दिल्याने झालेल्या अपघातात नऊ जण ठार झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली. अपघातात सहा जण जखमी झाले असून, चौघांची प्रकृती गंभीर आहे.

सोमनाथ रामचंद्र वायसे, रामू संजीवन यादव (दोघेही रा. नाझरे, ता. पुरंदर), अजयकुमार चव्हाण (रा. उत्तर प्रदेश), अजित अशोक जाधव (रा. कांजळे, ता. भोर), किरण भारत राऊत , त्यांचा मुलगा सार्थक (वय ७, रा. दोघेही पवारवाडी, ता. इंदापूर), अश्विनी संतोष ऐसार (रा. नागरसूर, सोलापूर), अक्षय शंकर राऊत (रा.झारगडवाडी, ता. बारामती) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या एकाची ओळख पटू शकली नाही. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेजुरी-मोरगाव रस्त्यावरील किर्लोस्कर कंपनीजवळ श्रीराम ढाब्याजवळ एक पिकअप टेम्पो थांबला होता. टेम्पोतील सामान खाली उतरवण्याचे काम सुरू होते. दोघे सामान उतरवित होते. या वेळी पुण्याकडून मोरगावकडे निघालेल्या एका भरधाव मोटारीने टेम्पोला धडक दिली. ही धडक एवढी जोरात होती की, शेजारी थांबलेल्या एका दुसऱ्या मोटारीला त्यानंतर धडक बसली.

टेम्पोतील सामान उतरविणारे दोघे तसेच, ढाब्यासमोर थांबलेले तिघे आणि मोटारीतील तिघांचा अशा आठ जणांचा जागीच मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये दोन लहान मुले, एका महिलेचा समावेश आहे. ढाबाचालक आणि कामगारांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. गंभीर जखमींना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. मोटारचालकाच्या बेजबाबदारपणामुळे अपघात घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.

अपघातानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त मोटार, टेम्पोचा चुराडा झाला होता. अपघातानंतर जेजुरी-मोरगाव रस्त्यावर कोंडी झाली होती. अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या सहाय्याने बाजूला काढण्यात आली. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. अपघातात चार वाहनांचे नुकसान झाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी! अजित पवारांचा स्वबळाचा इशारा…

पुणे / नगर सह्याद्री - राज्यात सध्या महायुतीचं सरकार असलं तरी स्थानिक निवडणुकीत सर्व पक्ष...

मनोज जरांगेंचा सरकारला अल्टीमेटम; बैठक निष्फळ, प्रमाणपत्र द्यावं लगेच आंदोलन सोडेन… राज्यात काय काय घडलं पहा

मुंबई | नगर सह्याद्री Maratha Reservation Row: आरक्षणाबाबत काम करणाऱ्या शिंदे समितीनं ६ महिन्यापासून...

मनोज जरांगे हा पवारांचा सुसाईड बॉम्ब; भाजप आमदार काय म्हणाले पहा

मुंबई / नगर सह्याद्री : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागण्यासाठीच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे....

चिचोंडीला कांदा मार्केट सुरु करण्याचा मानस: आ. कर्डिले

नेप्ती उपबाजार भव्य कांदा शेडचे भूमिपूजन अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नेप्ती उपबाजारची जागा कमी पडत...