spot_img
ब्रेकिंगआमदार लंके यांनी अजितदादांना अखेर कोललं! तुतारी फुंकण्यास झाले सज्ज, 'या' पदाधिकार्‍यांनी...

आमदार लंके यांनी अजितदादांना अखेर कोललं! तुतारी फुंकण्यास झाले सज्ज, ‘या’ पदाधिकार्‍यांनी मारली दांडी

spot_img

मुंबईच्या बैठकीला मारली दांडी | तुतारी फुंकण्यास झाले सज्ज | समर्थकांची अजित पवारांच्या विरोधात मुक्ताफळे

मुंबई | नगर सह्याद्री

शरद पवार- सुप्रिया सुळे यांच्या बोटाला पकडून राजकारणात एंट्री आणि पदरात आमदारकी पाडून घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडताच त्याच शरद पवार- सुप्रिया सुळे यांना राम राम ठोकत अजित पवार गटात सहभागी झालेल्या पारनेरचे आ. नीलेश लंके यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांना राम राम ठोकण्याचा निर्णय घेतलाय! त्यातूनच त्यांनी आज मुंबईत नगर लोकसभेच्या जागेसाठी आयोजित करण्यात आलेेल्या बैठकीचं निमंत्रण मिळाले असतानाही जाणे टाळले. गेल्या दोन दिवसात लंके यांच्या समर्थकांनी शरद पवार- सुप्रिया सुळे यांच्या स्टेटसच्या माध्यमातून अजित पवार यांच्यावर निशाणा साधण्यास प्रारंभ केल्याचेही समोर येत आहे. काल- परवा पर्यंत अजित पवारांचा उदोउदो करणारे लंके व त्यांच्या समर्थकांनी गेल्या दोन दिवसांपासून त्याच अजित पवार यांच्या विरोधात मुक्ताफळे वाहण्यास प्रारंभ केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी (बुधवारी) मुंबईत नगर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित केली होती. या बैठकीसाठी पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गायकवाड यांनी स्वत: जिल्ह्यातील पक्षाचे आमदार आणि पदाधिकारी यांना संपर्क साधून बैठकीची माहिती दिली व बैठकीसाठी उपस्थित राहण्याबाबत अजितदादांचा निरोप असल्याचे आवर्जुन सांगितले होते.

मुंबईत झालेल्या बैठकीसाठी लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असणारे आमदार नीलेश लंके हे हजेरी लावतील किंवा नाही याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र, प्रत्यक्षात बुधवारी झालेल्या बैठकीकडे आ. लंके यांनी पाठ फिरवली. दर आठवड्याच्या मंगळवारी अजित पवार यांच्या निवासस्थानी हजेरी लावणारे आ. लंके हे कालच्या मंगळवारी तिकडे फिरकलेच नाही. त्यांनी मतदारसंघात राहणेच पसंत केले.

अहमदनगर लोकसभेवर राष्ट्रवादीचा प्रबळ दावा
अहमदनगर लोकसभा मतदारसंघाबाबत पदाधिकार्‍यांची मुंबईत बैठक झाली. या बैठकीला मंत्री छगन भुजबळ, मंत्री धनंजय मुंडे, महिला आघाडीच्या रुपाली चाकणकर, जिल्हाध्यक्ष प्रशांत गायकवाड आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये जिल्हाध्यक्ष प्रशांत गायकवाड यांनी अहमदनगर लोकसभा मतदारसंघावर प्रबळ दावा सांगितला आहे. या मतदारसंघातील सहकारी संस्था, ग्रामपंचायती, बाजार समित्या, मजूर संस्था, दूध संघ बहुतांश संस्था राष्ट्रवादीकडे आहेत. जिल्ह्यातील चार आमदार राष्ट्रवादीकडे आहेत. या सर्व ठिकाणी अजित पवारांच्या विचारांची माणसे आहेत. त्यामुळे अहमदनगर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे सोडण्यात यावा अशी मागणी जिल्हाध्यक्ष प्रशांत गायकवाड यांनी बैठकीत केली. त्यास सर्व उपस्थितांनी पाठिंबाही दर्शविल्याचे सुत्रांनी सांगितले.

आमदारांसह पदाधिकार्‍यांनी फिरवली पाठ
अहमदनगर लोकसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीसाठी मुंबईत झालेल्या बैठकीला आमदार नीलेश लंके यांनी पाठ फिरवली. तसेच तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे, विक्रम कळमकर, पुनम मुंगसे, सुवर्णाताई धाडगे या पदाधिकार्‍यांनीही पाठ फिरवल्याचे सुत्रांनी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नडणाऱ्यांसह काँग्रेस अन्‌‍ ठाकरे सेना क्लीन बोल्ड

महानगरपालिकेत डॉ. सुजय विखे पाटील -आमदार संग्राम जगताप एक्सप्रेेस निर्णायक ठरणार! सारिपाट / शिवाजी शिर्के प्रभाग...

वनविभागाच्या हलगर्जीपणामुळेच तरुणाचा बळी!, कळस येथील घटनेला जबाबदार कोण?

पिंजरा लावण्याची जबाबदारी का झटकली? गणेश जगदाळे। पारनेर पारनेर तालुक्याच्या पश्चिमेला असलेल्या जुन्नर तालुका राज्यात बिबट्या...

जिल्ह्यात लेझर लाईट, दबाव हॉर्न व कार्बन डायऑक्साइड वायूच्या वापरावर बंदी

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ (१) नुसार...

मैदान ठरलं; तोडफोडीमुळे ‘अशी’ राजकीय गणिते बदलली!, आता आरक्षणाकडे नजरा..

सुनिल चोभे | नगर सह्याद्री अहिल्यानगर महापालिका निवडणुकीची उलटगणती सुरु झाली असून निवडणुकीचा राजकीय रंग...