अहिल्यानगर | नगर सह्याद्री
वस्तू आणि सेवांवरील जीएसटी कमी करण्याचा निर्णय सर्वसामान्यांसाठी लाभकारक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीएसटीमध्ये मोठ्या प्रमाणात कपात करण्याची घोषणा केली होती. त्याची अंमलबजावणी संपूर्ण देशात सुरू झाली आहे. यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. जीएसटी कमी झाल्याचा सामान्य माणसाला फायदा होतो की नाही हे पाहण्यासाठी अहिल्यानगर शहर जीएसटी समितीच्या संयोजकपदी भाजपचे जिल्हा सरचिटणीस निखिल वारे यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे पक्षाचे प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
निखिल वारे हे गेल्या 20 वर्षांपासून सामाजिक, राजकीय, आध्यात्मिक क्षेत्रांत कार्यरत आहेत. प्रभागातील विकास कामांबरोबरच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी ते उभे राहतात. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे काम सुरू आहे. तसेच कृषिउत्पन्न बाजार समिती व्यापारी असोसिएशनचे संचालक म्हणून काम पाहतात. फटाका असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून त्यांचे काम सुरू आहे. आता भाजपच्या शहर सरचिटणीसपदी त्यांची वण लागल्यावर त्यांनी पक्षासाठी जोमाने काम सुरू केले आहे.
युवकांचे मोठे संघटन त्यांनी उभे केले आहे. त्यांची दखल घेऊन नगर शहराच्या जीएसटी समितीच्या संयोजकपदी त्यांची निवड झाली आहे. आमदार संग्राम जगताप यांनी श्री. वारे यांचे अभिनंदन केले आहे. या नियुक्तीबद्दल भाजपचे प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी यांचा सत्कार निखिल वारे यांनी केला. मला दिलेली जबाबदारी मी पार पाडून सर्वसामान्य नागरिकांचे हित जोपासेन असे त्यांनी सांगितले. या नियुक्तीबद्दल भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, प्रदेश सदस्य सुनील रामदासी, सीए राजेंद्र काळे, बाबासाहेब सानप, अनंत देसाई, शशांक कुलकण व कार्यकर्ते यांनी देखील श्री. वारे यांचे अभिनंदन केले आहे.