spot_img
अहमदनगरनिघोजचा झाला बिहार? ग्रामस्थांनी सामुहिक बंद पाळत केली 'मोठी' मागणी, आरोपींना ती...

निघोजचा झाला बिहार? ग्रामस्थांनी सामुहिक बंद पाळत केली ‘मोठी’ मागणी, आरोपींना ती शिक्षा लागणार का?

spot_img

निघोज । नगर सहयाद्री
येथील हॉटेल व्यवसायिकांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थ, व्यापारी असोसिएशन, पत्रकार संघ, यांच्यासह विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येत सामुहिक बंद पाळण्यात आला. यावेळी हल्ला करणार्‍या आरोपींवर कठोर कारवाई करत मोक्का लावण्याची मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान ग्रामस्थांनी सदर हल्ल्याचा निषेध करत गावात मुक मोर्चा काढत पोलिस प्रशासनाला निवेदन दिले.

गुरुवारी (दि.४) रोजी सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत सर्व व्यवसायिकांनी स्वयंस्फूर्तीने बंद ठेऊन या घटनेचा निषेध केला. येत्या दोन दिवसांत पोलिसांनी आरोपींना अटक न केल्यास रस्तारोको आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला. यावेळी ठकाराम लंके, सचिन वराळ पाटील, रुपेश ढवण, खंडू भुकन, दत्ताजी उनवणे, बाबाजी वाघमारे, शशिकला भुकन, वसंत कवाद, नामदेवराव थोरात, अनिल शेटे, चंद्रकांत लामखडे, अमृता रसाळ, बबुशा वरखडे, प्रा.ज्ञानेश्वर कवाद, अंकुश लोखंडे, वसंत ढवण, बाळासाहेब रसाळ, योगेश वाव्हळ, महेश लोळगे, मयुर गुगळे, सोनीताई पवार, सुरेश खोसे पाटील, भास्करराव कवाद, आनंद भुकन, योगेश खाडे, जयसिंग हरेल, सागर आतकर, रवि रणसिंग यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

या हल्ला प्रकरणी ९ जुलै रोजी होणार्‍या ग्रामसभेत मोक्का अंतर्गत कारवाई करणयाचा ठराव घेण्यात येणार आहे. पारनेर व नगर पोलिसांनी या गुन्ह्यात हलगर्जीपणा केल्यास राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करुन आरोपींना कडक शिक्षा देण्याची मागणीही करण्यात आली. या गुन्ह्यांतील धोंड्या जाधव हा सराईत गुन्हेगार आहे. याची माहिती पोलीसांना आहे. मात्र स्थानिक पोलीस अशा गुन्हेगारांना पाठीशी घालत आहे. राजरोसपणे हा गुन्हेगार निघोज, टाकळी हाजी ता.शिरुर परिसरात फिरुण दहशत निर्माण करत आहे. हॉटेलवर हल्ला करुन त्याने ग्रामस्थांवर मोठी दहशत निर्माण केली आहे. त्यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. तसेच यावेळी ग्रामस्थांनी निषेध सभा घेत सर्व आरोपींवर कठोर कारवाईची मागणी यावेळी केली. दरम्यान यावेळी ग्रामस्थांनी गावातून मुक मोर्चा काढला. मळगंगा मंदीरासमोर जाहीर निषेध करत सभेत पोलिस प्रशासनाला निवेदन दिले.

निघोज परिसरात अवैध धंद्याचा सुळसुळाट
निघोज परिसरात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात आहेत. यामध्ये मटका, जुगार, अवैध दारू हे दोन नंबरचे धंदे मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र निघोज, पारनेर, नगर पोलीस खात्याला या धंद्याची परिपूर्ण माहिती असूनही ते डोळेझाक करतात. हप्ता दे धंदा कर ही त्यांची पद्धत समाजातील गुन्हेगारीला उत्तेजन देणारी आहे. अवैध धंदे बंद न झाल्यास याचा पाठपुरावा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करणार आहोत. प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याची भावना ग्रामस्थांनी बोलून दाखवली.

दोन आरोपी जेरबंद
निघोज-वडगाव रस्त्यावरील हॉटेल जत्राच्या मालकावर जीवघेणा हल्ला प्रकरणी आदिनाथ मच्छिद्र पठारे (रा. पठारवाडी, ता. पारनेर), धोंड्या उर्फ धोंडीभाऊ महादु जाधव (रा. निघोज कुंड ता. पारनेर ), सोन्या उर्फ प्रथमेश विजय सोनवणे (रा. निघोज ता. पारनेर) विशाल खंडु पठारे (रा. पठारवाडी, ता. पारनेर), शंकर केरु पठारे (रा. पठारवाडी, ता. पारनेर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून विशाल पठारे, शंकर पठारे यांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. दरम्यान इतर आरोपींच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...

मनपाचे दोन कर्मचारी निलंबित; कारण आलं समोर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- महापालिकेच्या मार्केट विभागातील कथित हप्तेखोरीच्या समाजमाध्यमातून प्रसारित झालेल्या ध्वनिफितीसंदर्भात आयुक्त तथा...