spot_img
महाराष्ट्र'शिर्डी विमानतळावर लवकरच नाईट लँडिंग'

‘शिर्डी विमानतळावर लवकरच नाईट लँडिंग’

spot_img

राहाता | नगर सह्याद्री
दिल्ली येथे गुरुवारी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची महाराष्ट्र राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील व डॉ. सुजय विखे पाटील यांनी भेट घेऊन राज्याच्या मंत्रिमंडळात पुन्हा स्थान दिल्याबद्दल गृहमंत्र्याचे आभार मानत शिर्डी विमानतळाच्या विकासासंदर्भात चर्चा केली. विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन झाले.

महायुतीच्या सरकारमध्ये शिड विधानसभा मतदारसंघाचे सातव्यांदा निवडणुकीत विजय संपादन करणारे आ.राधाकृष्ण विखे पाटील यांना भाजपने दुसऱ्या क्रमांकावर कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेण्याचा मान मिळून देत जलसंपदामंत्री या खात्याची जबाबदारी दिली त्याबद्दल गुरुवारी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिल्ली येथे जाऊन देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले.

या भेटी दरम्यान डॉ. सुजय विखे पाटील यांनी शिड विमानतळाच्या विकासासंदर्भात चर्चा करताना रात्रीच्या वेळी सुरक्षा दलाच्या कमतरतेमुळे विमानांना नाईट लँडिंगमध्ये अडचणी येतात. त्यामुळे रात्रीच्या लँडिंगला परवानगी मिळत नाही ही बाब लक्षात आणून दिल्यानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी तात्काळ सीआयएसएफचे अतिरिक्त सुरक्षा दल उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.

त्यामुळे आता लवकरच शिड विमानतळ येथे विमानांची नाईट लँडिंग सुविधा उपलब्ध होणार असल्याने जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व डॉ.सुजय विखे पाटील यांनी अनेक वर्षापासूनचा हा प्रलंबित प्रश्न सोडवल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर हादरलं! ‘अल्पवयीन मुलीवर अत्याचार’, नराधमाने शेतात नेलं अन्..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री:- अहिल्यानगरातील एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि धमकी दिल्याप्रकरणी प्रेम विजय...

गणेशभक्तांना दिलासा! विधिमंडळात मोठी घोषणा; वाचा एका क्लिकवर

मुंबई | नगर सह्याद्री लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला आता राज्य उत्सव म्हणून...

नगरात खळबळजनक प्रकार! टी-शर्टला धरून उचलले, डोक्याला लावला कट्टा अन्..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- गणेशवाडी, स्वस्तिक चौक येथील व्यापारी हिमेश दिलीप पोरवाल (वय 31)...

अहिल्यानगर-पुणे महामार्गावरील ‘तो’ शापित ‘युटर्न’; एकाच जागेवर गेले अकरा जीव..

पारनेर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर-पुणे महामार्गावर पारनेरमधील जातेगाव फाट्यावरील एका युटर्नवर सागर सुरेश धस...