निघोज । नगर सहयाद्री:-
बाजार समीतीचे माजी उपसभापती व माजी सरपंच संदीप पाटील वराळ यांच्या निघृण हत्येचा निषेध करण्यासाठी मंगळवार (दि.२१) रोजी निघोज येथे बंद पाळण्यात आला. २१ जानेवारी २०१७ रोजी गुन्हेगारांनी माजी उपसभापती व माजी सरपंच संदीप पाटील वराळ यांची निघोज एस टी बस स्थानक परिसरात निघृणपणे हत्या केली होती.
दि.२६. जानेवारी २०१७ च्या ग्रामसभेत सर्वानुमते ठराव घेऊन संदीप पाटील वराळ यांच्या हत्येचा निषेध करुण दि.२१ जानेवारी हा दिवस निषेध दिवस म्हणून काळा दिवस पाळायचा तसेच गाव बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला होता. गेली आठ वर्षांपासून निघोज ग्रामस्थ, व्यवसायीक, उद्योजक ग्रामसभेच्या ठरावाची अंमलबजावणी करुण दि.२१ जानेवारी हा दिवस काळा दिवस पाळीत बंद ठेवीत आहेत.
मंगळवार दि.२१ रोजी सकाळी सात ते बारा वाजेपर्यंत ग्रामस्थांनी काळा दिवस व बंद पाळीत संदीप पाटील वराळ यांच्या हत्येचा निषेध करीत बंद पाळीत व्यवसाय बंद ठेवले होते. आज सकाळी संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशन कार्यालयात संदीप पाटील वराळ यांच्या प्रतिमेचे पूजन करीत ग्रामस्थांनी श्रद्धांजली वाहीली. दुपारी बारा वाजेपासून व्यवसाय सुरू करण्यात आले आहेत.