spot_img
देशनववर्षाला दिल्ली हादरली; अख्ख कुटुंब संपवलं, पाच जणांच्या हत्येने खळबळ

नववर्षाला दिल्ली हादरली; अख्ख कुटुंब संपवलं, पाच जणांच्या हत्येने खळबळ

spot_img

नवी दिल्ली / वृत्तसंस्था –
देशभरात सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाचे स्वागत करत असतानाच राजधानी दिल्लीतून एक धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. लखनौच्या नाका पोलीस स्टेशन परिसरात एका हॅाटेलमध्ये मुलानेच आपल्या जन्मदात्या आईची आणि चार बहिणींची अत्यंत निर्घूणपणे हत्या केली आहे. या घटनेने राजधानी दिल्लीत मोठी खळबळ उडाली असून या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठत तरुणाला ताब्यात घेतले आहे. एकूण पाच जणांची हत्या झाली असून त्यांचे मृत्यदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, कौंटुबिक कलहामधून हत्या झाल्याचे बोलले जात आहे. तसेच या हत्या प्रकरणात मुलाच्या वडिलांचाही सहभाग असून घटनेनंतर वडिलांनी त्या ठिकाणाहून पळ काढला असल्याची माहिती काही माध्यमांनी दिली आहे. नाका येथील हॉटेलमध्ये घडलेल्या घटनेत पिता-पुत्राने आपले संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त केले आहे. हॉटेल शरणजीत येथे ही घटना घडल्याचे गुन्हे शाखेचे प्रमुख बबलू कुमार यांनी सांगितले.

बदर हा 30 डिसेंबर रोजी लखनौला आला होता. बदर याच्यासोबत त्यांचा मुलगा अर्शद, पत्नी अस्मा आणि चार मुली अलशिया (वय 19), रहमीन (वय18), अक्सा (वय 16) आणि आलिया (वय 9) होत्या. काल रात्री उशिरा आरोपी बदर आणि त्याचा मुलगा अर्शद याने पत्नी आणि चार मुलींची अत्यंत निर्घूणपणे हत्या केली. यानंतर बदरने घटनास्थळावरून पळ काढला. तर त्याचा मुलगा अर्शद खोलीतच बसून होता.

जेवणात गुंगीचं औषध दिलं अन्
माध्यमांतून मिळत असलेल्या माहितीनुसार, मयत असलेल्यांना काल रात्री जेवणात गुंगीचे औषध मिसळण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांच्या हाताची नस कापून आणि गळा आवळण्यात आला, अशी माहिती मिळत आहे. मात्र, या घटनेचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्येचं नेमकं कारण समजू शकेल. तसेच हत्येमागचे कारणही अद्यापर्यंत समजू शकलेले नाही.

आरोपीने स्वःताह फोन करून दिली माहिती
या प्रकरणात संशयित आरोपी अर्शद याने स्वःताह हॅाटेल कर्मचाऱ्याला फोन करून संपूर्ण घटना सांगितली. त्याने सांगितलेल्या घटनेमुळे हॅाटेल कर्मचारी भयभीत झाला आणि त्याने पोलिसांना फोन करून संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. नाका पोलिसांनी घटनास्थळ गाठले. त्यांना घटनस्थळावर ५ खून झाल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविल्यानंतर ते देखील तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तसेच पोलिसांनी आरोपीला अटक केली. आरोपीने स्वःताह गुन्हा केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. पोलीस चौकशीत त्याच्या वडिलांचाही सहभाग असल्याचे समोर आले असून या प्रकरणाचा पुढे तपास पोलीस करीत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कन्हैया दूध उद्योग समूहाचे सर्वेसर्वा शांताराम मामा लंके यांचे निधन

निघोज / नगर सह्याद्री : कन्हैया दूध उद्योग समूहाचे सर्वेसर्वा, मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे कार्याध्यक्ष...

‘लाडकी बहीण’वरून लाडक्या बहिणी भिडल्या; कोण काय म्हणाले पहा

मुंबई / नगर सह्याद्री - महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत...

लाच स्वीकारताना तलाठी अडकला जाळ्यात; नगरमध्ये कुठे घडला प्रकार पहा…

कोपरगाव | नगर सह्याद्री सदनिकेच्या खरेदीखताची नोंद सातबारा उतार्‍यावर करून देण्यासाठी साडेसहा हजार रुपयांची लाच...

चाईल्ड पोर्नोग्राफी व्हिडीओ व्हायरल करणे भोवले; काय घडलं पहा

चार इंस्टाग्रामधारकांवर गुन्हा दाखल अहिल्यानगर | नगर सह्याद्री लहान मुलांच्या लैंगिक शोषणाबाबतचे (चाईल्ड पोर्नोग्राफी) व्हिडीओ सोशल...