सातारा / नगर सह्याद्री –
जिल्ह्यातील फलटण येथील सरकारी रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणाला आता नवं आणि धक्कादायक वळण मिळालं आहे. या प्रकरणात आता एका विवाहितेच्या आत्महत्येचा संबंध असल्याचा संशय व्यक्त होत असून शवविच्छेदन अहवाल बदलला असल्याचा आरोप कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे. वाठार निंबाळकर येथील मयत विवाहिता दिपालीच्या आई-वडिलांनी हा गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे, या प्रकरणात नवा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. तर, पोलिसांपुढे तपासाचे आव्हान असणार आहे.
माझ्या मुलीच्या मृत्यू प्रकरणात चुकीचा शवविच्छेदन अहवाल तयार करण्यासाठी संबंधित महिला डॉक्टरवर दबाव टाकण्यात आला होता. मुलीचं लग्न अजिंक्य निंबाळकर या लष्करी अधिकाऱ्याशी 2021 मध्ये झालं होतं. विवाहानंतर सासरच्या मंडळींकडून दिपालीला मानसिक आणि शारिरीक छळाला सामोरं जावं लागलं. अखेर 19 ऑगस्ट 2025 रोजी दिपालीनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं. मात्र, दिपालीच्या आई भाग्यश्री यांनी ह्या आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडवकर यांना निवेदनाद्वारे केली आहे.
राजकीय दबाव, पोलिसांचे संगणमत
“मुलीच्या मृत्यूनंतर पाच दिवस पोलिसांनी शवविच्छेदन अहवाल दिला नव्हता. या अहवालावर सही करणाऱ्या महिला डॉक्टर ह्याच आत्महत्या केलेल्या डॉक्टर होत्या,” असं भाग्यश्री यांनी सांगितल्याने आता प्रकरणात आणखी गूढ वाढलं आहे. तसेच, दीपालीच्या कुटुंबियांच्या शंका आणखी गडद झाल्या आहेत. दरम्यान, या घटनेनंतर भाग्यश्री पाचांगणे यांनी सांगितलं की, “माझ्या मुलीच्या प्रकरणात राजकीय दबाव आणि पोलिसांच्या संगनमताने सत्य दडपलं गेलं. डॉक्टरवर चुकीचा अहवाल तयार करण्यासाठी दबाव होता, आणि त्यांनी आपल्या आत्महत्येच्या पत्रातही अशा प्रकारच्या दबावांचा उल्लेख केला आहे. त्यामुळे, आता या प्रकरणामध्ये पोलीस नेमकी कोणती भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
निलंबित पोलीस निरीक्षकाला 5 दिवसांची कोठडी
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरवर अत्याचाराचा आरोप असलेला निलंबित पोलिस उपनिरीक्षक गोपाल बदनेला पोलिसांनी अटक केल्यानंतर आज न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी बदनेच्या शोधासाठी पथके स्थापन केली होती. मात्र, स्वतः हून शनिवारी रात्री फलटण ग्रामीण पोलिसांसमोर शरण आला. पोलिसांनी शरण येताच रात्री दीड वाजेपर्यंत त्याची कसून चौकशी करत रविवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, आत्महत्या केलेल्या युवती डॉक्टरने हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पीएसआय गोपाल बदनेनं चार वेळा बलात्कार केल्याचे व घरमालकाचा मुलाग प्रशांत बनकरने गेल्या चार महिन्यांपासून शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचे नमूद केले होते.
PSI बदनेसोबत ६ महिने संपर्क, आत्महत्येपूर्वी बनकरला फोटो अन् मेसेज पाठवले; रुपाली चाकणकरांचा धक्कादायक खुलासा
साताऱ्याच्या फलटणमधील शासकीय रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर येत आहे. या प्रकरणातील दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांची चौकशी सुरू आहे. या प्रकरणाचा पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. आज राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी फलटणमध्ये जाऊन जिल्हा रुग्णालयाला भेट दिली आणि पत्रकार परिषद घेत या प्रकरणी अनेक धक्कादायक खुलासे केले. यावेळी रुपाली चाकणकर यांनी आरोपी आणि आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टर यांच्यातील संपर्काविषयी सांगितले.
‘जानेवारी ते मार्चदरम्यान डॉक्टर आणि पोलिस उपनिरीक्षक गोपाल बदने हे संपर्कात होते आणि त्यांचे अनेकदा बोलणं झालं होतं. त्यानंतर डॉक्टर आरोपी प्रशांत बनकरच्या संपर्कात होती, अशी माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली. तसंच, पोलिसांनी सीडीआर काढला आहे. त्यामुळे सुसाईड नोटमध्ये गोपाल बदने, प्रशांत बनकर यांची नावं होती. जानेवारी ते मार्चदरम्यान गोपाल बदनेसोबत डॉक्टर संपर्कात होती. त्यानंतर डॉक्टर आणि बदनेचा काही संवाद झाला नाही. त्यानंतर प्रशांत बनकरसोबत डॉक्टराचा संवाद झाल्याचा रेकॉर्ड आहे.’
रुपाली चाकणकर यांनी पुढे सांगितले की, ‘डॉक्टरने सुसाईड नोटमध्ये लिहिले होते की चार वेळा बलात्कार केला. त्यानुसार गोपाल बदने आणि डॉक्टर या दोघांचे लोकेशन कुठे एकत्र होतं का? हे सीडीआरच्या माध्यमातून काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. सीडीआर आणि फॉरेन्सिकच्या अहवालातून लोकेशन शोधलं जाणार आहे. पोलिसांकडून गोपाल बदनेचा जबाब नोंदवला जात आहे. पोलिसांकडून डॉक्टर, बदने आणि बनकर या तिघांचाही सीडीआर काढला जात आहे. तर इतरांचा सीडीआर गरजेचा पडला तर तो काढला जाईल.’
दरम्यान, ‘या प्रकरणाचे सर्व अपडेट महिला आयोगाकडून रोज घेतले जात आहेत. आम्ही याबाबत आवश्यक सूचना देत आहोत. सीडीआर, फॉरेन्सिक अहवाल अशीच कारवाई केली जाईल. या प्रकरणाचा तपास एसपी, डीव्हायएसपी, सायबर सर्व एकत्रितपणे करत आहेत. ‘, असे रुपाली चाकणकर यांनी सांगितले. या प्रकरणातील आरोपींविरोधात कठोरात कठोर कारवाई व्हावी आणि आरोपींना फाशी देण्यात यावी अशी मागणी डॉक्टरच्या कुटुंबीयांनी केली आहे.
त्यावर आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरचीच सही
मिळालेल्या माहितीनुसार साताऱ्यातील महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात सातारा जिल्ह्यातील वठार निंबाळकर गावातील एका कुटुंबाने अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांची घेतली भेट. फलटण येथील वाठार निंबाळकर येथील विवाहित मुलीने आत्महत्या केलेला शवविच्छेदनाचा अहवाल खोटा असल्याचा आरोप या दाम्पत्याने केला आहे. आमच्या मुलीच्या शवविच्छेदनाच्या अहवालावर सध्या आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरचीच सही होती. त्यामुळे आमच्या मुलीच्या शवविच्छेदनाचा अहवाल तयार करताना महिला डॉक्टरवर कोणाचा दबाव होता, हे तपासलं पाहिजे, अशी मागणी या दाम्पत्याने केली आहे.
चुकीचा शवविच्छेदन अहवाल?
या दाम्पत्याच्या खळबळजनक दाव्यानंतर आता साताऱ्यातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या प्रकरणाचा एका विवाहितेच्या आत्महत्येशी संबंध असल्याचा संशय व्यक्त होत आहे. मयत विवाहितेच नाव दिपाली असे आहे.मयत दिपालीची आई भाग्यश्री पाचांगणे यांनी तिच्या मुलीच्या मृत्यू प्रकरणात चुकीचा शवविच्छेदन अहवाल तयार करण्यासाठी संबंधित महिला डॉक्टरवर दबाव टाकण्यात आला होता, असा दावा केला आहे. दीपाली यांचे 2021 साली अजिंक्य निंबाळकर या लष्करी अधिकाऱ्याशी लग्न झाले होते.
माझ्या मुलीच्या मृत्यूनंतर पाच दिवस पोलिसांनी…
विवाहानंतर सासरच्या मंडळींकडून दिपालीला मानसिक आणि शारिरीक छळाला सामोरं जावं लागलं, असा पाचांगणे दाम्पत्याचा आरोप आहे. अखेर 19 ऑगस्ट 2025 रोजी दिपालीनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं. मात्र, दिपालीच्या आई भाग्यश्री यांनी या आत्महत्येची सखोल चौकशी करण्याची मागणी अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांना निवेदनाद्वारे केली आहे. “माझ्या मुलीच्या मृत्यूनंतर पाच दिवस पोलिसांनी शवविच्छेदन अहवाल दिला नव्हता. या अहवालावर सही करणाऱ्या महिला डॉक्टरनेच आता आत्महत्या केली आहे,” असं भाग्यश्री यांनी सांगितलं आहे.
आता पोलीस नेमकी काय भूमिका घेणार?
“माझ्या मुलीच्या प्रकरणात राजकीय दबाव आणि पोलिसांच्या संगनमताने सत्य दडपलं गेलं. डॉक्टरवर चुकीचा अहवाल तयार करण्यासाठी दबाव होता आणि त्यांनी आपल्या आत्महत्येच्या पत्रातही अशा प्रकारच्या दबावांचा उल्लेख केला आहे, असाही दावा पाचांगणे कुटुंबाने केला आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये पोलीस नेमकी कोणती भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.



