मुंबई | नगर सह्याद्री:-
बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी (ता. २३) पोलीस चकमकीत मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूवरून आरोप प्रत्यारोप होत असताना आता या एन्काऊंटर प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. पोलिसांवर गोळीबार केल्याप्रकरणी आरोपी अक्षय शिंदे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी अक्षय शिंदेवर मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बदलापूरमध्ये घडलेल्या चिमुकल्या मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी पोलिसांच्या चकमकीत ठार झाला आहे. पोलिसांनी स्वरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत आहे. विरोधकांकडून याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित कऱण्यात येत आहेत. बदलापूरजवळ झालेल्या या खळबळजनक घटनेमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.बदलापूर येथील एन्काऊंटर प्रकरणी अक्षय शिंदे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी अक्षय शिंदेवर मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंब्रा बायपास रोडवर पोलिसांची बंदूक हिसकावून पोलिसांवरती तीन गोळ्या झाडल्याचा अक्षय शिंदेवर आरोप आहे.
अक्षय शिंदे याच्या गोळीबारात सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे जखमी झाले होते. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.दरम्यान, पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी स्वत:च्या बचावासाठी अक्षय शिंदे याच्यावर गोळ्या झाडल्या. यामध्ये अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला. याप्रकरणी महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. बदलापूर प्रकरणातील खरे आरोपी समोर येऊ नयेत म्हणून हा एन्काऊंटर झाला आहे का? असा सवाल विरोधी पक्षातील नेत्यांनी केला आहे. तर अक्षय शिंदे हा काही साधूसंत नव्हता.
त्याने पोलिसांची बंदूक हिसकावून गोळीबार केला. स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी केलेल्या कारवाईत तो ठार झाला, असं सत्ताधार्यांनी म्हटलं आहे.दुसरीकडे अक्षय शिंदे याच्या आईनेही पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. माझा मुलगा हा रस्ता ओलांडतानाही हात पकडायचा, तो पोलिसांची बंदूक हिसकावून त्यांच्यावर गोळीबार कसा करू शकतो. त्याला जाणून बुजून मारण्यात आलं आहे, असं अक्षय शिंदे याच्या आईने म्हटलं आहे. दरम्यान, अक्षय शिंदे याच्या या संशयास्पद एन्काऊंटरची चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असून, ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी पोलिस उपायुक्त (अर्थ गुन्हे विभाग) पराग मनेरे यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.