spot_img
अहमदनगरनेवाशाचा विजय नगरमध्ये करायचा तसलं काम; पोलिसांनी 'अशा' आवळल्या मुसक्या...

नेवाशाचा विजय नगरमध्ये करायचा तसलं काम; पोलिसांनी ‘अशा’ आवळल्या मुसक्या…

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री
कोतवाली पोलीसांनी दुचाकी चोरीच्या प्रकरणात उल्लेखनीय कामगिरी करत सराईत चोरट्यास अटक केली असून त्याच्याकडून १ लाख पाच हजार रुपये किंमतीच्या दोन सुझुकी अॅक्सेस मोपेड दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. कोतवाली पोलीस दोन वेगवेगळे दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. दि. २ जून रोजी सकाळी ८.४५ वाजेच्या सुमारास भाजीपाला मार्केट, मार्केट यार्ड येथून गणेश भैरुलाल कांकरिया यांची सुझुकी अॅक्सेस (एम.एचा १६ डी. डी. १७२३) ही दुचाकी चोरीस गेली होती. तर दि. ३० मे रोजी दुपारी वाडिया पार्क येथील आर्यन मोबाईल शॉप समोरून अनिल दुर्गा जंगम यांची सुझुकी अॅक्सेस (एम.एच १६ डी. ई २८१६) दुचाकी चोरीस गेली होती.

पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी पोलीस स्टेशन हद्दीतील दुचाकी चोरीचे गांभीर्य लक्षात घेत कारवाईच्या पथकाला सूचना दिल्या. पथकाने तांत्रिक माहिती, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय बातमीदारांच्या आधारे तपास सुरु केला. तपासादरम्यान सदरचा गुन्हा आरोपी विजय अशोक लेंडाळ (वय 23, रा. उत्सल दुमाला, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) याने केल्याचे निष्पन्न झाले. आरोपीला ०६ जून रोजी नेवासा पोलीसांनी दुसऱ्या गुन्ह्यात अटक केली होती. त्याच्याकडून एक चोरलेला विवो कंपनीचा एक मोबाइल तसेच ६५ हजार रुपये किंमतीची पांढऱ्या रंगाची सुझुकी अॅक्सेस, ४० हजार रुपये किंमतीची कॉफी रंगाची सुझुकी अॅक्सेस जप्त करण्यात आली. यानंतर कोतवाली पोलीसांनी त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने दुचाकी चोरल्याची कबुली दिली.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, सहाय्यक पो.नि. योगिता कोकाटे, पो.उपनिरीक्षक गणेश देशमुख, पो.हे.कॉ. राजेंद्र औटी, पो.हे.कॉ. विशाल दळवी, पो.हे.कॉ. योगेश कवाष्टे, संदिप पितळे, म.पो.हे.कॉ. रोहीणी दरंदले, पो.कॉ. दिपक रोहोकले, तानाजी पवार, सोमनाथ केकान, महेश पवार, सोमनाथ राऊत, सुरज कदम, सचिन लोळगे, दत्तात्रय कोतकर, शिरीष तरटे, म.पो.कॉ. प्रतिभा नागरे व दक्षिण विभाग मोबाईल सेलचे पो.कॉ. राहुल गुंडु यांनी बजावली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पावसामुळे नुकसान झालेल्या केडगाव अमरधाम, आंबेडकर भवनाची आयुक्तांकडून पाहणी

पडलेल्या भिंती बांधण्याचे काम तत्काळ सुरू करा : आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे अहिल्यानगर ।...

मनपा, झेडपी निवडणुकांसाठी रणशिंग फुंकले!, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेनेकडून जोर बैठका..

सुनील चोभे | नगर सह्याद्री आगामी दोन-तीन महिन्यांत होऊ घातलेल्या महापालिका, नगर पंचायती, नगर परिषदा,...

ठाकरे ब्रँड बुडाला! आदित्य ठाकरेंचा पावसाळा आता कारागृहात?; मंत्री नितेश राणेंचे खळबळजनक वक्तव्य…

Politics News: राज्याचे मंत्री आणि भाजप नेते नितेश राणे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून...

शहरासह जिल्ह्यात बकरी ईद उत्साहात साजरी; शांतता व सामाजिक सलोख्यासाठी प्रार्थना

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरासह जिल्ह्यात मुस्लिम समाज बांधवांनी बकरी ईद (ईद उल अजहा) शनिवारी...