spot_img
महाराष्ट्रमामाच्या घरी भाच्याने लावली गळ्याला दोर!, चिठ्ठीत काय लिहलं?

मामाच्या घरी भाच्याने लावली गळ्याला दोर!, चिठ्ठीत काय लिहलं?

spot_img

Maharashtra Crime News: जुळे सोलापूरयेथे एका सोळा वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आईच्या मृत्यूच्या नैराश्यातून युवकांनी टोकाचे पाऊल उचलत गळफास घेऊन मामाच्या घरी आत्महत्या केली. शिवशरण तळकोटी असे आत्महत्या केलेल्या अकरावीत शिकणाऱ्या युवकाचे नाव आहे. तीन महिन्यापूर्वी आईचं कावीळ झाल्यामुळे निधन झालं होतं. शिवशरण याला आईच्या मृत्यूमुळे मोठा धक्का बसला होता. शिवशरण याने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या व्यथा चिठ्ठीच्या माध्यमातून व्यक्त केले आहेत.

‘मी शिवशरण. मी मरत आहे…कारण मला जगण्याची इच्छा नाही. माझी आई गेली तेव्हाच जायला पाहिजे होते पण मी मामा व आजीचे तोंड बघून जिवंत होतो. माझ्या मरण्याचे कारण म्हणजे.. आई काल स्वप्नात आली होती. ‘तू जास्त तणावात का आहेस ? माझ्याकडे ये..’ असे म्हणून तिने मला बोलावले. त्यामुळे मी मरण्याचा विचार केला. मी मामाचे व आजीचे खूप आभार मानतो, कारण त्यांनी मला खूप सपोर्ट केला. माझे लाड पुरवले. मामा…. मी मरत आहे. मी गेल्यावर माझ्या बहिणीला सुखात ठेव. मी कुठेही नाही जाणार. परत येणार आहे, वाट पाहा. मामा, मला तुला एक सांगायचं आहे. आजीला पप्पाकडे पाठवू नको. सगळ्यांनी आपापली काळजी घ्या. तू मला आईबाबांपेक्षा जास्त केलंस’, अशी भावनिक चिठ्ठी त्याने टोकाचं पाऊल उचलण्याआधी लिहली आहे.

सोलापुरातील शिवशरण तळकोटी या 16 वर्षीय तरूणाने आपल्या मामाच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. तीन महिन्यापूर्वी त्याच्या आईचं कावीळ झाल्यामुळे निधन झालं होतं. शिवशरण याला आईच्या मृत्यूमुळे मोठा धक्का बसला होता. शिवशरण आईच्या मृत्यूनंतर त्याच्या मामाकडे राहात होता, त्यानंतर त्याने आता टोकाचं पाऊल उचललं आहे. त्याने टोकाचं पाऊल उलण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहली आहे. यामध्ये त्याने आईने आपल्याला बोलावलं असल्याचं म्हटलं आहे. आई काल स्वप्नात आली होती. ‘तू जास्त तणावात का आहेस ? माझ्याकडे ये..’ असे म्हणून तिने मला बोलावले. त्यामुळे मी मरण्याचा विचार केला. मी मामाचे व आजीचे खूप आभार मानतो, कारण त्यांनी मला खूप सपोर्ट केला. माझे लाड पुरवले. मामा…. मी मरत आहे. मी गेल्यावर माझ्या बहिणीला सुखात ठेव. मी कुठेही नाही जाणार. परत येणार आहे, वाट पाहा, असंही त्याने म्हटलं आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्याचे रविवारी अनावरण; कोण कोण राहणार उपस्थित पहा

मार्केट यार्ड चौक येथे महानगरपालिकेच्या वतीने भव्य कार्यक्रमाचे आयोजन / कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीच्या मार्गात...

भयंकर! चालत्या अ‍ॅम्ब्युलन्समध्ये पेशंटवर अत्याचार, कुठे घडला प्रकार पहा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - एक अतिशय धक्कादायक अशी घटना पुढे आली. होमगार्डच्या भरतीसाठी...

लाडकी बहीण योजनेबद्दल अजितदादांकडून मोठी अपडेट; ‘त्या’ महिलांसह पुरुषांना बसणार झटका!

मुंबई / नगर सह्याद्री - महाराष्ट्रातील ज्या कुटुंबांचं उत्पन्न हे अडीच लाखांच्या आत आहे,...

नोकराकडून आजीला अडीच लाखांच्या खंडणीची मागणी

10 तोळ्याचे गंठणही चोरले । तोफखान्यात गुन्हा अहिल्यानगर । नगर सह्याद्री मुलाला वाचवायचे असेल तर...