spot_img
अहमदनगरसमाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सेवाभावाची गरज: राजेश भंडारी

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सेवाभावाची गरज: राजेश भंडारी

spot_img

निघोजमध्ये जैन स्थानकाच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन
निघोज । नगर सहयाद्री:-
समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सेवाभावाने कार्य करणे अत्यंत आवश्यक असून, समाजातील प्रत्येक घटकाने या दृष्टीने पुढाकार घेतला पाहिजे, असे प्रतिपादन उद्योगपती व पारनेर तालुका जैन समाज महासंघाचे अध्यक्ष राजेश भंडारी यांनी व्यक्त केले. निघोज येथे जैन समाजाच्या नवीन स्थानकाच्या भुमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

यावेळी माजी सभापती कुंदनकाका साखला, सुनिती ज्वेलर्सचे गणेशशेठ कटारिया, मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे माजी अध्यक्ष प्रभाकरशेठ कवाद, निघोज नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन वसंत कवाद, माजी सरपंच ठकाराम लंके, जनसेवा फाउंडेशनचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील वराळ, उपसरपंच ज्ञानेश्वर वरखडे, ग्रामपंचायत सदस्या सुधामती कवाद, बाळासाहेब ढुमणे, नामदेवराव थोरात, चेतन भळगट, पैलवान सुभाष वराळ आदींसह मान्यवर उपस्थित होते. जैन समाजाचे जुने स्थानक हे सुमारे ६० वर्षांपूर्वी बांधण्यात आले होते.

कालबाह्य झालेल्या या इमारतीच्या जागी चार हजार स्क्वेअर फूट क्षेत्रफळ असलेली नवीन तीन मजली भव्य इमारत उभारण्यात येणार आहे. या बांधकामासाठी ५० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून, प्रत्यक्षात हा खर्च अधिक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावेळी राज्यातील जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीचे दर्शन समाजबांधवांनी घेतले. तसेच वाजत गाजत मिरवणूक काढीत ग्रामस्थ व समाजबांधव कार्यक्रमस्थळी आले. यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त करीत मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन ज्येष्ठ मार्गदर्शक सुर्यकांत लोढा, कुंदनमल लोढा, व्यापारी असोसिएशन पदाधिकारी सुदर्शन लोढा, जैन महासंघाचे प्रवक्ते यश लोढा, सुमतीशेठ फिरोदिया, बाळासाहेब भंडारी, जैन समाज मंडळ उपाध्यक्ष प्रदिप गांधी, मनोज गांधी, सतिष लोढा,प्रमोद लोढा, कुंदन मुथीयान, विजय भंडारी, प्रविण चोपडा, विनोद लोढा, रामलाल गांधी, शुभम गांधी, अमित गांधी, अमर भंडारी, आनंद मुनोत, ललित गांधी, अक्षय भंडारी, सचिन मुथीयान, मयुर गुगळे, विपुल फिरोदिया, मनोज लोढा, केतन गांधी आदी तसेच समाजबांधवांनी केले. सूत्रसंचालन सुदर्शन लोढा यांनी केले तर यश लोढा यांनी उपस्थितांचे आभार मानले.

लोकसहभागातून विकासाचा नवा अध्याय
जैन समाजाच्या नवीन स्थानक प्रकल्पासाठी सुमारे ५० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून प्रत्यक्षात हा खर्च अधिक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे जैन समाजातील युवकांनी परिसरातील लोकप्रतिनिधींकडे शासकीय योजनांतून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. भुमिपूजन कार्यक्रमाच्या वेळी पालकमंत्री, खासदार, आमदार यांच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी पाठपुरावा करून मदत करण्याचे आश्वासन दिले. मात्र ही आश्वासने प्रत्यक्षात येतील का, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे लोकसहभागातूनच हा प्रकल्प यशस्वी करण्याचा निर्धार समाजबांधव व ग्रामस्थांनी केला आहे. सर्वांनी एकत्र येऊन आर्थिक मदत उभी केल्यास ही भव्य इमारत वर्षभरात पूर्ण होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

…हे तर संगमनेरला बदनाम करण्याचे षडयंत्र; आमदार सत्यजीत तांबे मामा थोरातांबरोबर मैदानात

संगमनेर । नगर सहयाद्री संगमनेरमधील कीर्तनात झालेल्या राजकीय गोंधळानंतर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी तापल्या आहेत. संग्रामबापू...

ह.भ.प. संग्रामबापू भंडारे महाराजांना पोलीस संरक्षण द्या; भाजपच्या शिष्टमंडळाची मागणी

अहिल्यानगर । नगर सहयाद्री संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथे कीर्तनादरम्यान समाजप्रबोधनकार ह.भ.प. संग्रामबापू भंडारे महाराज यांच्यावर...

करण ठुबे याने नीटमध्ये उज्वल यश मिळवून कुटुंब, गाव, पारनेर पब्लिक स्कूलचे नाव उंचावले

नीटमध्ये यश मिळाल्याबद्दल मित्र परिवार व ग्रामस्थांच्यावतीने सत्कार सुपा | नगर सह्याद्री करण दादाभाऊ...

मीच ज्योतीरामला मारला! वेटरनेच घेतला वेटरचा जीव, अहिल्यानगरमधील घटना, कारण काय?

जामखेड । नगर सहयाद्री:- जामखेड तालुक्यातील शिऊरफटा येथील सात बारा हॉटेलमध्ये किरकोळ वादातून वेटरने...