spot_img
अहमदनगरअट्टल गुन्हेगारांवर पोलिसांकडून धाडसी कारवाईची गरज : आ. जगताप

अट्टल गुन्हेगारांवर पोलिसांकडून धाडसी कारवाईची गरज : आ. जगताप

spot_img

अहमदनगर / नगर सहयाद्री : राहुरी शहरातील वकील दांपत्याचे अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली. ही निषेधार्थ जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. यात आ. संग्राम जगताप सहभागी झाले होते. त्यांनी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांची भेट घेत जिल्ह्यातील अट्टल गुन्हेगारांवर पोलिसांनी धाडसी कारवाईची करण्याची खरी गरज असल्याचे बोलून दाखवले.

यावेळी आ.जगताप म्हणाले, वकील दांपत्याच्या हत्येचा खटला फास्ट ट्रक कोर्टात चालवावा, सरकारी वकील म्हणून ऍड. उज्वल निकम यांची नियुक्ती करावी, तसेच लवकरच वकिलांचा प्रलंबित असलेला वकील संरक्षण कायदा मंजूर करण्यासाठी अधिवेशनात लेखी स्वरूपाचा प्रश्न उपस्थित करणार आहे.

सराईत गुन्हेगारांवर यापूर्वीच पोलिसांनी कारवाया केल्या असत्या तर अशा स्वरूपाच्या घटना घडल्या नसत्या, समाजविघातक लोकांना कायद्याचा धाक दाखवणे गरजेचे आहे, या घटनेचा निषेध करत वकिलांच्या तीव्र भावना शासन दरबारी मांडणार असून तुम्ही जिल्ह्याचे प्रमुख असून या घटनेचा अहवाल शासनाकडे पाठवावा अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी केली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, मा.नगरसेवक प्रकाश भागानगरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष अभिजित खोसे तसेच जिल्हाभरातील वकील उपस्थित होते.

राहुरी शहरातील वकील दांपत्य खून खटल्याचा निषेध करत विविध मागण्यांसाठी जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने काढण्यात आलेला पायी भव्य मोर्चा जिल्हा न्यायालय, डीएसपी चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी आंदोलनकर्ते वकील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...