spot_img
ब्रेकिंगराष्ट्रवादीची ताकद वाढणार; 'या' ४ बड्या नेत्यांचा पक्षप्रवेश होणार?

राष्ट्रवादीची ताकद वाढणार; ‘या’ ४ बड्या नेत्यांचा पक्षप्रवेश होणार?

spot_img

Politics News: सांगली जिल्ह्यातील राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हं आहेत. जिल्ह्यातील चार माजी आमदार आणि जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती आज मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे सांगली जिल्ह्यात अजित पवार गटाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.

या नेत्यांमध्ये माजी मंत्री शिवाजीराव नाईक, अजितराव घोरपडे, विलासराव जगताप, राजेंद्रअण्णा देशमुख आणि रवी तमनगौडा पाटील यांचा समावेश आहे. यापैकी काहीजण शरद पवार यांच्या गटात होते, काही भाजपमधून बाहेर पडले, तर काही राजकीयदृष्ट्या निष्क्रिय होते. आता हे सर्वजण राष्ट्रवादी अजित पवार गटात सक्रिय होत असल्याने जिल्ह्यातील समीकरणं पूर्णपणे बदलू शकतात.

या नेत्यांनी गेल्या काही दिवसांत मिरज परिसरात अनेक बैठकांचे आयोजन केले होते. आपल्या राजकीय भवितव्यासाठी योग्य पक्ष निवडण्याचा विचार सुरू असताना अखेर त्यांनी अजित पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील मतदारसंघांमध्ये याचा निश्चितच परिणाम होणार असल्याची चर्चा आहे.

रवी तमनगौडा पाटील हे भाजपमधील माजी नेते होते. जतमधून उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांनी गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात अपक्ष लढत दिली होती, मात्र त्यात त्यांचा पराभव झाला होता. आता त्यांनीही अजित पवार गटात प्रवेश घेतल्याने भाजपला धक्का बसल्याचं चित्र आहे.

या पाचही नेत्यांचा प्रवेश म्हणजे सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादी अजित पवार गटासाठी मोठा टर्निंग पॉइंट ठरणार आहे.राष्ट्रवादीच्या विभाजनावेळी जिल्ह्यात एकही मोठा नेता अजित पवार यांच्यासोबत गेला नव्हता. आता मात्र चार माजी आमदार आणि अन्य स्थानिक नेत्यांच्या प्रवेशामुळे गटाची ताकद वाढणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

इंजेक्शन जीवावर बेतलं, दोन चिमुरड्यांचा मृत्यू!; ‘या’ हॉस्पिटलमध्ये घडला प्रकार

Butox Injection Death: एका हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान दोन्ही बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली...

अहिल्यानगरमध्ये धक्कादायक प्रकार; महिलेच्या बंगल्यावर दरोडा

अकोले | नगर सह्याद्री अकोले शहरातील परवानाधारक देशी दारू विक्रेत्या काशीबाई म्हतारबा डोंगरे (रा.देवठाण रोड...

‘मळगंगा देवीच्या घागर दर्शनासाठी लोटला जनसागर’

निघोज | नगर सह्याद्री राज्याचे जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीच्या यात्रेसाठी लाखोंचा जनसमुदाय उपस्थित होता....

देव तारी त्याला कोण मारी! भजनामुळे शेतकऱ्याची बिबट्याच्या जबड्यातून सुटका, ‘असा’ घडला प्रकार

सुपा | नगर सह्याद्री अध्यात्म म्हणा किंवा ईश्वरनामाचा जप म्हणा, त्याची प्रचिती केव्हा येईल हे...