अहिल्यानगर | नगर सह्याद्री :-
शहरात शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक आहेत. लोकसभा निवडणुकीत सर्व ताकद पणाला लावून खासदार नीलेश लंके यांच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. तरीही विधानसभेला शिवसेनेला उमेदवारी नाकारली. यामुळे शहरात पक्षाचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते. कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र झाल्या असून, सर्वांनी एकत्रितपणे बंडखोरी करत उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे व माजी महापौर भगवान फुलसौंदर हे मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याचे शहर प्रमुख संभाजी कदम यांनी सांगितले. तसेच सर्व शिवसैनिकांची सोमवारी मते जाणून घेतली. यावेळी शिवसैनिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.

गेली 35 वर्षे सलग नगर शहर मतदार संघातून निवडणूक लढविणाऱ्या शिवसेनेऐवजी महाविकास आघाडीकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला उमेदवारी देण्यात आल्याने आघाडीत धुसफूस सुरू झाली आहे. सेनेच्या ठाकरे गटाची रविवारी सायंकाळी नगरमध्ये बैठक पार पडली. यात नगरची जागा हक्काची असतानाही सोडण्यात आल्याने खासदार संजय राऊत यांच्या विरोधात कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी असंतोष व्यक्त करून जोरदार घोषणाबाजी केली. शहरात शिवसेनेची मोठी ताकद आहे. असे असतानाही जागा सोडल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची भावना आहे. यातून पक्षाचे अस्तित्वही धोक्यात येऊ शकते. आगामी महापालिका निवडणुकीवरही याचा परिणाम होऊ शकतो.
त्यामुळे ठाकरे गटाने नगरची जागा कोणत्याही परिस्थितीत लढवावी, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. पक्षाने फेरविचार न केल्यास प्रा. गाडे व फुलसौंदर मंगळवारी अर्ज दाखल करतील. त्यानंतर दोघांपैकी एकाच्या नावावर निर्णय होऊन ठाकरे गट अपक्ष उमेदवारी करेल, असा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याचे कदम यांनी सांगितले. बैठकीस बाळासाहेब बोराटे, संजय शेंडगे, गणेश कवडे यांच्यासह आजी माजी नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.
काँग्रेसचा सवता सुभा, बैठका सुरू
नगर शहर विधानसभा मतदारसंघावर महविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट व काँग्रेसनेही दावा सांगितला होता. परंतु येथील जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाला सुटल्याने शिवसेना व काँग्रेसमध्ये तीव्र नाराजीचा सूर दिसून येत आहे. नगरच्या जागेचा निर्णय बदलावा, येथील जागा काँग्रेसला सोडण्यात यावी अशी मागणी होवू लागली आहे. तसेच जागा न सुटल्यास बंडखोरी होण्याचेही संकेत मिळत आहेत.