spot_img
महाराष्ट्रLok Sabha 2024: राष्ट्रवादीने डाव टाकला! छगन भुजबळ लोकसभा लढवणार, 'या' जागेवरून...

Lok Sabha 2024: राष्ट्रवादीने डाव टाकला! छगन भुजबळ लोकसभा लढवणार, ‘या’ जागेवरून उमेदवारी फायनल?

spot_img

Lok Sabha 2024: सध्या संपूर्ण महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. राज्यात राजकीय वातावरण पूर्णपणे तापलेले आहे. त्यातच महायुतीच्या जागा वाटपात नवा ट्विस्ट समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ लोकसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत.

भारतीय जनता पक्षाने नाशिक मतदारसंघातून छगन भुजबळ यांनी भाजपच्या कमळ या चिन्हावर उमेदवारी करावी, असा प्रस्ताव दिला आहे. हा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फेटाळून लावला आहे, तर भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावरच निवडणूक लढवतील, अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केली होती.

सूत्रांच्या माहितीनुसार, आज पुण्यात छगन भुजबळ यांच्या उमेदवारीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. सकाळी ८ वाजता छगन भुजबळ पदाधिकाऱ्यांसह पुण्याला रवाना झाले आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातून छगन भुजबळ यांची उमेदवारी निश्चित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

श्रीरामपूर: नगराध्यक्ष पदासाठी चौघांची एन्ट्री, तर नगरसेवक पदासाठी दहा उमेदवार रिंगणात ; कोणी केले अर्ज सादर?

श्रीरामपूर / नगर सह्याद्री नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी शहरात उमेदवारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून...

नगर–मनमाड महामार्गावर अग्नितांडव! लक्झरी बस–कारची भीषण धडक; कारचालक जळून ठार

अहिल्यानगर / नगर सह्याद्री – नगर–मनमाड महामार्गावर कोपरगावजवळील भास्कर वस्ती येथे शुक्रवारी (14 नोव्हेंबर)...

​महापालिका निवडणूक: मतदार यादीचा ‘मुहूर्त’ पुन्हा लांबणीवर

​महापालिका निवडणूक: मतदार यादीचा ‘मुहूर्त’ पुन्हा लांबणीवर आता २० नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार प्रारूप यादी ​दुबार नावांचा...

डॉ. बोरगेंच्या अडचणी कायम ; साडेसोळा लाखांच्या अपहार प्रकरणी अधिक तपासाचे आदेश

डॉ. बोरगेंच्या अडचणी कायम ; साडेसोळा लाखांच्या अपहार प्रकरणी अधिक तपासाचे आदेश ९ फेब्रुवारीपर्यंत अहवाल...