spot_img
अहमदनगरअहमदनगर लोकसभा उमेद्वाराबाबत जयंत पाटलांचे मोठे वक्तव्य, म्हणाले आता...

अहमदनगर लोकसभा उमेद्वाराबाबत जयंत पाटलांचे मोठे वक्तव्य, म्हणाले आता…

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री –
निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाच्या संदर्भात आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणार आहोत. राज्यामध्ये महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या संदर्भात दि.९ फेब्रुवारीला एक बैठक आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी केली आहे. तसेच अहमदनगर लोकसभेसाठी लवकरच उमेदवार जाहीर करू असेही ते म्हणाले.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्जत येथे राष्ट्रवादीच्या वतीने कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी विजय निश्चय’ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर नगर येथे राष्ट्रवादी भवन येथे नगर, राहुरी, शेवगाव, पारनेर, विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांची संयुक्त बैठक जयंत पाटील यांच्या मार्गदर्शानाखाली पार पडली. या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, आमदार प्राजक्त तनपुरे, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, प्रदेश सचिव प्रताप ढाकणे, अभिषेक कळमकर, शिवसेनेचे संदेश कार्ले, बाबासाहेब भिटे, रामेश्वर निमसे, योगिता राजळे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी जयंत पाटील म्हणाले, महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या संदर्भामध्ये याआधीही बैठका झालेल्या आहेत. ९ तारखेला पुन्हा बैठक होणार आहे. नगरच्या जागेच्या संदर्भामध्ये लवकरच आम्ही उमेदवार जाहीर करू व तो उमेदवार निश्चितपणे विजयी होणारच असेल असाही दावा त्यांनी यावेळी केला. राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी तीन जागा दिल्या तर आपण महाविकास आघाडी मध्ये येऊ, असे सांगितले. वास्तविक पाहता त्यांना एक जागा दिली जाईल. पण ते इतर जागांची मागणी करत आहे, महाविकास आघाडीमध्ये इतरांसाठी त्या जागा आहेत. त्यामुळे आम्ही त्यामध्ये बदल करू शकत नाही, आमचा जानकरांचा जिव्हाळा हा चांगला आहे, पण त्यांचा जो विचार आहे, तो आम्ही पक्ष म्हणून मान्य करू शकत नाही, असेही ते म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अक्षय कर्डिलेंना जिल्हा बँकेत तोच न्याय मिळणार का?

अहिल्यानगर / नगर सह्याद्री आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या अकाली निधनानंतर जिल्ह्याच्या राजकारणासह जिल्हा बँकेत...

..आता दिल्लीनेही दखल घेतली पाहिजे, अशी तयारी करा; राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश

मुंबई । नगर सहयाद्री:- राज्यातील विरोधकांनी निवडणूक आयोगाच्याविरोधात आता एल्गार पुकारला आहे. विरोधकांनी रस्त्यावर उतरून...

संतापजनक! रुग्णवाहिकेत आशा वर्करसोबत भयंकर घडलं, रात्री परतताना चालकाने केलं असं काही..

Maharashtra Crime News : महिलांचा लैंगिक छळ, अत्याचाराच्या घटना अजूनही थांबत नाहीत. अशात सहकाऱ्याकडूनच...

हवामान खात्याची महत्वाची अपडेट, काय दिला इशारा?, वाचा सविस्तर

मुंबई । नगर सहयाद्री:- कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांत गेल्या दोन दिवसांपासून...