spot_img
ब्रेकिंगलोकसभेच्या 'या' 12 जागांवर राष्ट्रवादीचा दावा; नेमकं काय म्हणाले अजित दादा...

लोकसभेच्या ‘या’ 12 जागांवर राष्ट्रवादीचा दावा; नेमकं काय म्हणाले अजित दादा…

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री –
लोकसभा निवडणूक अगदी तोंडावर आहे. अशात जागा वाटपाचा मुद्दा चर्चेत आहे. राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीचं जागावाटप जाहीर झालेलं नाही. भाजपकडून 195 उमेदवाराच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली आहे. मात्र महाराष्ट्रातील जागा वाटपावर अद्याप चर्चा सुरु आहे. अशात अजित पवार यांच्या गटाकडून काही जागांसाठी आग्रह धरला जात आहे. बारामतीसह 12 जागांवर अजित पवार गटाकडून दावा सांगितला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

या जागांसाठी अजित पवार गट आग्रही?
बारामती, रायगड, सातारा, शिरूर या राष्ट्रवादीकडे असणाऱ्या जागांसाठी अजित पवार गट आग्रही आहे. तर शिंदे गटाकडे असणाऱ्या बुलढाणा, हिंगोली जागा लढण्यासाठी अजित पवार गट इच्छुक आहे. भाजपकडच्या गडचिरोली, माढा या जागांची मागणी अजित पवार करत आहेत. शिवाय धाराशिव परभणी या ठाकरे गटाकडे असणाऱ्या जागांवरही अजित पवार गटाने दावा केलाय.

अजित पवार शिरूरमध्ये…
शिरुरचे खासदार अमोल कोल्हे आणि आमदार अशोक पवारांच्या होमपिचवर अजित पवारांची टोफ आज धडाडणार आहे. शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा इथं अजित पवार यांचा शेतकरी मेळावा होत आहे. मांडवगण फराटा इथं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं सहा जेसीबींमधून पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात येणार आहे.

महायुतीची बैठक
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात आज महायुतीची महत्त्वाची बैठक होत आहे. मंत्री चंद्रकांत पाटील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. बारामती, शिरूर, आणि पुणे या 3 लोकसभा मतदार संघासाठी चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पुण्यात होणार आहे. महायुतीतले सर्व घटक पक्ष बैठकीला हजर राहणार आहेत. सर्व स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत चंद्रकांत पाटील चर्चा करणार आहेत. तिन्ही लोकसभा मतदारसंघांचा चंद्रकांत पाटील आढावा घेत वरिष्ठांना अहवाल देणार आहेत.

कोण उपस्थित राहणार?
आज बारा वाजल्यापासून पुण्यातील भाजप मुख्य कार्यालयात बैठक सुरु होणार आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार असून महायुतीतल्या घटक पक्षांच्या सर्व स्थानिक पदाधिकाऱ्यांना चंद्रकांत पाटील मार्गदर्शन करणार आहेत. भाजप, शिवसेना , राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष(अजित पवार),आरपीआय, शेतकरी संघटना, लोक जनशक्ती पार्टी, शिवसंग्राम या पक्षांचे नेते या बैठकीला उपस्थित असतील.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर शहरात परीक्षेच्या तयारीसाठी आलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री अल्पवयीन मुलीशी प्रेमाचे नाटके करत, वारंवार फोटो व्हायरल करण्याची धमकी...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींच्या विजयाची सुरवात, भरघोस यश प्राप्त होणार..

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य मानसिक शांततेसाठी तुमचा तणाव दूर करा. चैतन्याने सळसळता...

पावसाळी अधिवेशन विरोधकांनी तापवलं; पहिल्याच दिवशी काय-काय घडलं?

मुंबई | नगर सह्याद्री आजपासून (दि.३० जून) राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. हे...

पंजाबराव डख यांनी दिला शेतकऱ्यांना सल्ला; निसर्गाच्या विरोधात शेती कराल तर..

पारनेर । नगर सहयाद्री:- हवामानाचा अभ्यास करून शेती करणे ही काळाची गरज आहे. मोठ्या...