spot_img
अहमदनगरउमेदवारीसाठी इच्छुक राष्ट्रवादीच्या दारी; कोणी कोणी दिल्या मुलाखती...

उमेदवारीसाठी इच्छुक राष्ट्रवादीच्या दारी; कोणी कोणी दिल्या मुलाखती…

spot_img

२०० जणांनी दिले अर्ज; भाजप-राष्ट्रवादी युतीच्या संकेतांनंतर हालचाली वेगवान
अहिल्यानगर | नगर सह्याद्री

आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण आणि मतदार यादी झाली नसतानाही राष्ट्रवादीने इच्छुकांची चाचपणी सुरू केली आहे. रविवारी इच्छुकांकडून मुलाखतीसाठी अर्ज भरून घेण्यात आले. भाजपचे दोन तर सावेडीतील काँग्रेस माजी नगरसेवकाने राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवारी करण्याची तयारी दर्शविली आहे. उमेदवारीच्या मुलाखतीसाठीचा तसा अर्ज राष्ट्रवादीकडे देण्यात आले. तब्बल २०० पेक्षा अधिक इच्छुकांनी अर्ज दिले आहेत.

महापालिकेची निवडणूक डिसेंबरमध्ये घोषित होण्याची शयता गृहीत धरत राष्ट्रवादीने तयारी सुरू केली आहे. आ. संग्राम जगताप यांच्या निर्देशाने शहरजिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांच्यासह पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी इच्छुकांची चाचपणी केली. शासकीय विश्रामगृहावर सकाळपासून राष्ट्रवादी पक्षाकडून लढण्यासाठी इच्छुक असणार्‍यांनी उमेदवारीच्या मुलाखतीसाठी अर्ज भरून देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. आ. संग्राम जगताप हेही यावेळी उपस्थित होते. नगर शहरातील महापालिकेच्या १७ प्रभागातून दोनशे पेक्षा अधिक इच्छुकांनी उमेदवारीसाठी अर्ज केले आहेत.
मंगळवारी मुंबईत पक्षाचे प्रमुख उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्याचा आढावा घेणार आहेत. त्यावेळी नगर महापालिकेची स्थिती सांगण्यात येणार आहे. कोण कोणत्या प्रभागातून इच्छुक आहेत, इच्छुकांची संख्या व त्यांचे जनमत यावर मुंबईतील बैठकीत चर्चा होणार आहे. आरक्षण व प्रभागनिहाय मतदार याद्या जाहीर झाल्यानंतर पक्षाचे राज्यातील नेते नगरला येतील. तेही इच्छुकांशी संवाद साधतील, त्यानंतर उमेदवारी निश्चित होणार आहे. मात्र उपमुख्यमंत्री पवार यांच्यासमोर नगरचा आढावा मांडण्याच्या हेतूने राष्ट्रवादीने इच्छुकांकडून अर्ज घेतल्याचे सांगण्यात आले.

भाजप-राष्ट्रवादीची युती?
शनिवारी भाजप-राष्ट्रवादी युतीचे संकेत अन् रविवारी लगेच चाचपणी महापालिकेसाठी भाजप व राष्ट्रवादी समन्वयाने उमेदवारी देतील असे सांगत भाजपचे माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी शनिवारी भाजप-राष्ट्रवादी एकत्रितपणे निवडणूक लढणार असल्याचे संकेत दिले. शहर विकासासाठी आ. संग्राम जगताप यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट करतानाच महापौर, सभापती पदाच्या संघर्षात पडणार नसल्याचेही सांगितले. त्यानंतर दुसर्‍याच दिवशी म्हणजे रविवारी आ.संग्राम जगताप यांनी राष्ट्रवादीकडून महापालिका निवडणूक लढवू इच्छिणार्‍यांची चाचपणी केली. महापालिका निवडणुकीसाठी भाजप-राष्ट्रवादीची युती होईल, शिंदे सेन स्वतंत्र लढेल असे बोलले जात आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दहा लाख चौरसफुट ओपनस्पेसचा १०० कोटींचा घोटाळा!

मनपाच्या आकृतीबंधात नगर रचनाकार हे पदच नाही, तरीही त्याला दिले सहायक संचालकांचे अधिकार |...

आ. संग्राम जगताप यांचा जैन मंदिर ट्रस्टचा भूखंड हडप करण्याचा डाव; थाटले कार्यालय, ठाकरे सेनेचा काय आहे आरोप पहा

पुणे / नगर सह्याद्री - पुण्यातील जैन हॉस्टेल भूखंड प्रकरणातून उडालेला धुरळा खाली बसत नाही...

पीएम किसान योजना; ‘या’ शेतकऱ्यांच्या खात्यात येणार नाहीत पैसे, काय कारण पहा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - PM Kisan Yojana : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी पीएम किसान...

सुप्रसिद्ध विधिज्ञ अ‍ॅडव्होकेट असीम सरोदेंची सनद रद्द , बार कौन्सिलचा मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?

पुणे / नगर सह्याद्री - पुण्यातील सुप्रसिद्ध विधिज्ञ अ‍ॅडव्होकेट असीम सरोदे यांची वकिलीची सनद...