spot_img
राजकारणराष्ट्रवादीचे नवाब मलिक आले परंतु कार्यालयात मात्र 'यांच्या' गेले..चर्चांना उधाण

राष्ट्रवादीचे नवाब मलिक आले परंतु कार्यालयात मात्र ‘यांच्या’ गेले..चर्चांना उधाण

spot_img

नगर सह्याद्री / नागपूर : नागपूर येथे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु होतेय. २० डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन चालेल. या अधिवेशनात राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक हेदेखील असणार आहेत.

परंतु सध्या एका घटनेने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याचे झाले असे की, नवाब मलिक अधिवेशनासाठी नुकतेच विधानभवन परिसरात दाखल झाले व ते अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री अनिल पाटील यांच्या कार्यालयात गेलेले दिसले. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

नवाब मलिक शरद पवार गटाला पाठिंबा देणार की अजित पवार गटाला याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. सुप्रीम कोर्टाकडून मिळालेल्या जामिनानंतर तुरुंगातून बाहेर आलेले नवाब मलिक हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात जाणार की शरद पवार गटात जाणार याबाबत निश्चितता नव्हती. ईडीकडून करण्यात आलेल्या अटकेनंतर गेल्या अनेक महिन्यांपासून सक्रिय राजकारणापासून काहीसे दूर गेलेले मलिक हे सध्या जामिनावर बाहेर असून अनेक दिवसांनी ते सभागृहात दिसतील.

दरम्यान, विरोधकांच्या टीकेला सडेतोड उत्तर द्या. आपसात समन्वय ठेवा. कोणत्याही पद्धतीने सरकारवर नामुष्की येणार नाही याची काळजी घ्या, असा सल्ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी सहकारी मंत्र्यांना दिला. दोन्ही सभागृहात मंत्री नसल्यामुळे कामकाज तहकूब करावे लागण्याची पाळी सरकारवर गेल्या अधिवेशनात तीन-चार वेळा आली होती.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

देवेंद्रजी, नगरमध्ये शेकडो वाल्मिकअण्णा!; बीडचा आका डांबला; नगरमधल्या आकांचे काय?

शहरात कोणत्याही क्षणी उद्रेक होणार | सर्वाधिक आका एकट्या नगर अन् पारनेरमध्ये! सारिपाट / शिवाजी...

हेच का महापालिकेचे फ्लेसमुक्त धोरण?; किरण काळे यांनी साधला निशाणा, म्हणाले…

पुतळा व नाट्यगृहाचे काम तात्काळ पूर्ण करा अहिल्यानगर | नगर सह्याद्री नुकतेच मनपा आयुक्त यशवंत डांगे...

मूर्तिकारांचा प्रश्न संसदेत मांडणार ः खा. नीलेश लंके

अहिल्यानगर | नगर सह्याद्री संसदेत प्रश्न मांडून केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांशी चर्चा करून मूर्तिकारांचा प्रश्न मार्गी...

पीओपी गणेश मूर्तीवरील बंदी हटवा; आमदार जगताप म्हणाले…

विधानसभेत आवाज उठवा | गणेश मूर्तिकार संघटनेचे आ. जगताप यांना साकडे अहिल्यानगर | नगर सह्याद्री पीओपी...