spot_img
अहमदनगरनवकार महामंत्र मनुष्याला आतून शुध्द करतो : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवकार महामंत्र मनुष्याला आतून शुध्द करतो : पंतप्रधान नरेंद्र मोदी

spot_img

अहिल्यानगरमध्ये भाविकांच्या अभूतपूर्व उत्साहात विश्व नवकार महामंत्र दिवस कार्यक्रम
अहिल्यानगर / नगर सह्याद्री :
विश्व नवकार महामंत्र दिवसानिमित्त नगरमध्ये जितो अहिल्यानगरच्यावतीने आयोजित धार्मिक परीक्षा बोर्ड येथे झालेल्या भव्यदिव्य सोहळ्यात सामूहिक नवकार मंत्र जापाने वातावरण मंत्रमुग्ध बनले. सकाळी ठिक 7.02 वाजता सुरु झालेल्या या कार्यक्रमात नवकार मंत्र जाप, नगरच्या स्थानिक कलाकारांचा नवकार नाद कार्यक्रम, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ऑनलाईन मार्गदर्शन अशा अतिशय पवित्र वातावरणात हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या दिनानिमित्त नवकार महामंत्रासाठी अहिल्यानगर मधून देशातील दुसऱ्या क्रमांकांची 1 लाखांहून अधिक सदस्यांनी नोंदणी केली. पुरुष भाविक शुभ्र वस्त्र तर महिला भाविक लाल साडी, वेशभूषा परिधान करून कार्यक्रमात सहभागी झाले होते.

नगरमधील या कार्यक्रमाप्रसंगी महाराष्ट्र प्रवर्तक पूज्य कुंदऋषीजी म.सा., प्रबुध्द विचारक पू.आदर्शऋषीजी म.सा., पूज्य आलोकऋषीजी म.सा. आदी साधू साध्वीजींसह जैन श्रावक संघाचे अध्यक्ष हस्तीमलजी मुनोत, बडीसाजन श्री संघाचे अध्यक्ष पेमराज बोथरा, जैन ओसवाल पंचायत सभेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया, आनंदराम मुनोत, सी.ए.रमेश फिरोदिया, अनिल पोखरणा, छायाताई फिरोदिया, आशाताई फिरोदिया, चंद्रकांत मुनोत फौंडेशनच्या इंदिरा मुनोत, नरेंद्र बाफना, सुधीर, निलेश चोपडा, अभिजित विनोद गांधी, गौतम मुनोत, अमित मुथा, आलोक मुनोत, तुषार कर्नावट, अमित पोखरणा, सुमंगला मुनोत, सौरभ भंडारी, जितेंद्र लोढा, प्रितेश दुगड, गौतम मुथा, मेघना मुनोत, चेतन भंडारी, यश भंडारी, संगिता मुथियान, अंशु मुनोत, सोनाली डुंगरवाल, दीपाली मुथा, खुशबू मुनोत, रितेश पटवा, चिराग शेटिया, निखिल गांधी, ऋषभ बोरा आदींसह जितो सदस्य तसेच नगरमधील श्रावक, श्राविका, सर्व समाजातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमात ऑनलाईन सहभागी झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, नवकार महामंत्र ज्ञान व कर्माचे महत्व दर्शवतो. गुरु हाच जीवनाला प्रकाश देणारा असतो. नवकार महामंत्र स्वत:वर विश्वास ठेवायला सांगतो. नकारात्मक विचार, अविश्वास, वैमनस्य, स्वार्थ या शत्रूंना जिंकणे हाच खरा विजय आहे. जैन धर्म हीच स्वत:ला जिंकण्याची प्रेरणा देतो. जेव्हा आपण स्वत: विजयी होतो तेव्हा अरिहंत बनतो. नवकार महामंत्र हा एक मार्ग आहे, जो मनुष्याला आतून शुध्द करतो. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी प्रत्येकाला नवकार महामंत्र दिनानिमित्त 9 संकल्प करण्याचे आवाहन केले. यात पाणी बचत, आईच्या नावे एक झाड लावणे, स्वच्छता मिशन, वोकल फॉर लोकल,देश दर्शन, नैसर्गिक शेती, आरोग्यसंपन्न जीवनशैली, योग व खेळाला प्राधान्य आणि गरीबांना मदत करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन त्यांनी केले.

प्रास्ताविकात जितो अहिल्यानगरचे चेअरमन आलोक मुनोत यांनी सांगितले की, संपूर्ण जगभरात बुधवारी एकाचवेळी नवकार महामंत्राचा सामूहिक जाप होत आहे. अहिल्यानगर येथे भाविकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्याने जितोच्या कार्याला बळ मिळाले आहे. जवळपास 60 संस्थांनी या उपक्रमासाठी उत्स्फूर्त योगदान दिले. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी महाराष्ट्रात प्रथम तर देशात दुसऱ्या क्रमांकाची नोंदणी अहिल्यानगर येथे झाली याचा अभिमान वाटतो.

पूज्य कूंदनऋषीजी महाराज म्हणाले, जितोने नवकार महामंत्राचा जो भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित केला आहे तो कौतुकास्पद आहे. जितोने देशभरात जैन साधूसाध्वीजींसाठी मोठे कार्य चालवले आहे. विज्ञानानेही नवकार महामंत्राला सर्वश्रेष्ठ मंत्र मानला आहे. हा मंत्र मानवाला मिळालेले सर्वात मोठे वरदान आहे.

पूज्य आदर्शऋषीजी म.सा.म्हणाले, जैन हा जातीवाचक शब्द नसून गुणवाचक शब्द आहे. जो तीर्थंकर, त्यांच्या सिध्दांतांना मानतो तो जैन असतो. भवान महावीर, नवकार महामंत्र आणि शाकाहार ही जैनिझमची खरी ओळख आहे. नवकार मंत्रात महान ताकद आहे. त्यांची अनुभूती जगाला यावी यासाठी आयोजित हा विशेष कार्यक्रम ऐतिहासिक ठरणारा आहे. येथून पुढे दर महिन्याच्या 9 तारखेला नवकार मंत्राचा सामूहिक जाप केला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

संपूर्ण नगर जिल्ह्यात विविध स्थानके, मंगल कार्यालयात, गावांमध्ये भाविकांनी या ऑनलाइन सोहळ्याला उपस्थित राहून स्थानिक स्तरावर नवकार महामंत्र’ जाप केला. यावेळी नवकार नाद कार्यक्रम सादर करणारे पवन नाईक व त्यांच्या सहकारी कलाकारांचा विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रसाद बेडेकर यांनी केले. तुषार कर्नावट यांनी सर्वांचे आभार मानले. तसेच धार्मिक परीक्षा बोर्ड व केशरगुलाब ट्रस्टचेही विशेष आभार व्यक्त केले. कार्यक्रमानंतर सर्वांसाठी केशरगुलाब मंगल कार्यालयात साईदीप ग्रुपतर्फे गौतम प्रसादीची व्यवस्था करण्यात आली होती.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सूर्यदेव आग ओकतोय!, महाराष्ट्रातील ‘या’ भागात तापमान वाढणार..

मुंबई । नगर सहयाद्री:- राज्यात पुन्हा तापमान वाढायला सुरूवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून...

राज-उद्धव युती! महाराष्ट्रात नव्या समीकरणाची नांदी? राज्यात चर्चेला उधाण..

मुंबई । नगर सहयाद्री:- उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का? हा सवाल गेल्या...

जेईई मेनचा निकाल जाहीर; महाराष्ट्रातील किती विद्यार्थी पास? ‘असा’ पहा निकाल..

JEE Main 2025 Results Out::- नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) शुक्रवारी रात्री जेईई मेन सेशन-...

जावयाचा सासुरवाडीवर हल्ला; कारण काय?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- आपल्या गरोदर मुलीला माहेरी घेऊन जात असताना तिच्या आई-वडिलांवर जावयाने...