Himachal Pradesh:हिमाचल प्रदेशात ढगफुटीमुळे पडत असलेल्या मुसळधार पावसाने प्रचंड नुकसान झाले असून, अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. विशेषत: मंडी जिल्ह्यात ढगफुटीने हाहाकार माजवला असून, हवामानशास्त्र विभागाने मंडी, कांगडा आणि सिरमोरमध्ये नव्याने रेड अलर्ट जारी केला आहे. राज्यात आतापर्यंत 75 जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, येत्या 24 तासांसाठी देशभरातील 15 राज्यांत पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. हिमाचल प्रदेशासह देशाच्या अन्य भागांत अचानक पडत असलेला मुसळधार पाऊस व सततची ढगफुटी हा जागतिक तापमानवाढीचा परिणाम असल्याचे पर्यावरण व हवामान बदलाविषयीचे अभ्यासक तसेच राज्याचे अधिकारी सुरेश अत्री यांनी म्हटले आहे.
हिमाचलमध्ये मान्सूनमुळे आतापर्यंत 75 जणांचा मृत्यू झाला आहे. 113 जण जखमी झाले आहेत, तर 37 जण अजूनही बेपत्ता आहेत. मुख्यमंत्री राज्यात 700 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा करत असले तरी, आपत्ती व्यवस्थापनाने 541 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आकडा दिला आहे. राज्यात 261 रस्ते बंद आहेत. 300 ट्रान्सफॉर्मर बंद आहेत. 281 पिण्याच्या पाण्याच्या योजनांचा पाणीपुरवठा खंडित झाला आहे.
पावसाचा कहर
566 ते 700 कोटींचे नुकसान
150 घरांची पडझड
31 वाहनांचे नुकसान
74 जणांचा मृत्यू
164 जनावरांचा मृत्यू