spot_img
देशनिसर्ग कोपला; अतिमुसळधार पाऊस, ठिकठिकाणी भूस्खलन; 1800 पर्यटक अडकले

निसर्ग कोपला; अतिमुसळधार पाऊस, ठिकठिकाणी भूस्खलन; 1800 पर्यटक अडकले

spot_img

नवी दिल्ली / वृत्तसंस्था –
जम्मू काश्मीरच्या पहलगाम भागामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानं देश हादरलेला असतानाच आणखी एका भागात नैसर्गिक आपत्तीमुळं भयावह परिस्थिती उदभवल्याचं पाहायला मिळत आहे. देशाच्या सिक्कीम प्रांतातील उत्तरेकडे असणाऱ्या चुंगथांग शहरात भूस्खलनानंतर यंत्रणेनं तातडीन बचावकार्य सुरू करत 1100 हून अधिक पर्यटकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केलं. तर, उर्वरित 1800 हून अधिक पर्यटक अद्यापही मदतीच्या प्रतीक्षेत असल्याचं म्हटलं जात आहे. प्रभावित क्षेत्रातील या सर्व पर्यटकांना सध्या चुंगथांपासून साधारण 100 किमी अंतरावर असणाऱ्या गंगटोक इथं आणण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे.

उत्तर सिक्कीममधील लाचेन आणि लाचुंग या दोन गिरिस्थानांवर गुरुवारी रात्री स्टेशन भागात भूस्खलन झालं आणि यामुळं इथं हजारो पर्यटक अडकून पडले. मांगनचे पोलीस अधीक्षक सोनम डेट्चू भूतिया याच्या माहितीनुसार भूस्खलनामुळे ज्यांची वाहनं रस्त्यावर अडकली होती त्या पर्यटकांना नजीकच्याच गावांमध्ये गुरुवारी रात्री मुक्कामी ठेवण्यात आलं आणि शुक्रवारी त्यांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आलं. इथं पर्यटकांनी पोलीस स्टेशन, गुरुद्वारा, इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस कॅम्प आणि स्थानिकांच्या घरांमध्ये आसरा घेतला.

पावसानं जोर धरला आणि परिस्थिती बिघडू लागली
जिल्हा पोलिस प्रमुखांच्या माहितीनुसार गुरुवारी दुपारपासूनच सिक्कीमच्या या भागात पावसानं जोर धरला आणि परिस्थिती बिघडू लागली. सततच्या या पावसामुळे भूस्खलनामुळे होत चुंगथांगहून लाचेनला जाणाऱ्या रस्त्यावर मुनशिथांगजवळ आणि चुंगथांगहून लाचुंगला जाणाऱ्या रस्त्यावर लिमाजवळ अनेक ठिकाणी रस्त्यांची दूरवस्था झाली आणि इथल्या अनेक वाटा बंद झाल्या.

रस्त्यांची स्थिती आणि हवमानाचा मारा पाहता उत्तर सिक्कीममध्ये प्रवास करण्यासाठीचे परवाने शुक्रवारी रद्द करण्यात आले होते. सावधगिरी म्हणून जिल्हा प्रशासनाने टूर ऑपरेटर्सना परिस्थिती सुधारेपर्यंत पर्यटकांना उत्तर सिक्कीममध्ये पाठवू नये असे निर्देशही दिले.

सिक्किम येथे ग्लेशियर लेक फुटून आलेल्या पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या ठिकाणांपैकी लाचेन हे एक ठिकाण होते. जवळपास दीड वर्ष संपर्क तुटल्यानंतर यावर्षी मार्च महिन्यात हे ठिकाण पर्यटकांसाठी खुले झाले होते. मात्र आता इथं पुन्हा पावसामुळं परिस्थिती बिघडल्यानं या भागात पर्यटनावर उदरनिर्वाह करणाऱ्या स्थानिकांच्या अडचणींमध्ये नव्यानं भर पडली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आरक्षण जाहीर; संभाव्य उमेदवार लागले तयारीला!

आ. संग्राम जगताप आणि डॉ. सुजय विखे पाटील यांची सहमती एक्सप्रेस नगर महापालिकेत विरोधकांना...

महाराष्ट्रात हुडहुडी! विदर्भ – मराठवाड्यात कडाक्याची थंडी, पुढील 4 दिवस तापमान कसे राहणार?

मुंबई / नगर सह्याद्री - Weather Update: देशभरात सध्या हवामान वेगाने बदलताना दिसतंय ....

निवडणुकीच्या तोंडावर उबाठा शिवसेनेत फेरबदल; जिल्हाप्रमुखपदी कुणाची निवड?

लोकसभा संघटकपदी गाडे, दक्षिण जिल्हाप्रमुखपदी दळवी, महानगर प्रमुखपदी काळे यांच्या निवडी अहिल्यानगर | नगर सह्याद्री शिवसेना...

पारनेर नगराध्यक्षपदाच्या निवडीत दडपशाही; महायुतीचे पत्रकार परिषदेत आरोप, हंगा वरून कारभार पाहणाऱ्यांना धडा शिकवणार!

पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर नगराध्यक्ष पदाच्या निवडीत महायुती व महाविकास आघाडीमध्ये चांगलाच कलगीतुरा...