तालुकाध्यक्ष विक्रम कळमकर यांची माहिती
पारनेर । नगर सहयाद्री:-
पारनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कार्यकर्त्यांचा मेळावा तसेच नवनिर्वाचीत आ. काशिनाथ दाते सर यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला असल्याची माहिती तालुकाध्यक्ष विक्रम कळमकर यांनी दिली आहे.
शनिवार दि.२८ रोजी सकाळी १०. वाजता जिल्हाध्यक्ष अशोकराव सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पारनेर येथील नगर जिल्हा सहकारी बँकेच्या सभागृहात राष्ट्रवादीचा मेळावा पार पडणार आहे. यावेळी नगर जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवा, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती मधुकर उचाळे, माजी नगराध्यक्ष विजय औटी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अपेक्षित असलेल्या पक्षाची ध्येय धोरणे व विचारधारा जन सामान्यांपर्यंत पोहचविणे, सभासद नोंदणी वाढवून गाव तेथे पक्षाची शाखा स्थापन करणे तसेच नवनिर्वाचीत आ. काशिनाथ दाते यांचा पक्षाच्या वतीने सन्मान करण्यात येणार आहे. तरी सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतक या सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन पक्षाच्या महिला विभागाच्या अध्यक्षा सुषमा रावडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष भास्कर उचाळे यांनी केले आहे.