spot_img
ब्रेकिंगराष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरण; सुनावणीबाबत मोठा निर्णय, न्यायालयात आज काय घडलं? वाचा...

राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरण; सुनावणीबाबत मोठा निर्णय, न्यायालयात आज काय घडलं? वाचा एका क्लिकवर..

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री:-
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची याचिका एकाच दिवशी ऐकू असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने अजित पवारांसह त्यांच्यासोबत केलेल्या आमदारांना नोटीस जारी केली आहे. यावर तीन सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या आमदार अपात्रता प्रकरणाच्या निर्णयाविरोधात शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. अजित पवार यांच्यासह त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना अपात्र करा अशी मागणी जयंत पाटील यांनी केली आहे. या याचिकेविरोधात सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली. आजच्या सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने शिवसेना आमदार अपात्र प्रकरण आणि राष्ट्रवादीचे आमदार अपात्रता प्रकरण एकाच दिवशी ऐकू असे मुख्य न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी म्हटले आहे.

पुढची सुनावणी एकापाठोपाठ ऐकू असे म्हणत कोर्टाकडून अजित पवार आणि त्यांच्यासह गेलेल्या आमदारांना नोटीसही पाठवली आहे.दरम्यान, याप्रकरणी पुढील सुनावणी ही ३ सप्टेंबर रोजी होणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून राष्ट्रवादी तसेच शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणी झालेली नाही. त्यामुळे सप्टेंबरमध्ये होणाऱ्या सुनावणीत कोर्ट मोठा निर्णय देणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ठाकरे बंधू एकत्र: आजच्या सभेतील सर्व मुद्दे एकाच क्लिकवर

मुंबई | नगर सह्याद्री महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षणात पहिलीपासून हिंदी शिकवण्या संदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द...

नगर शहरात मध्यरात्री अघोरी प्रकार? सीसीटीव्हीमध्ये हालचाली कैद, पहा काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहरातील बागडपट्टी येथे अघोरी विद्या, करणी व जादूटोण्याचा घडल्याचा...

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट! वाचा, जिल्ह्यात कुठे किती पाऊस?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री- मे महिन्यात अहिल्यानगरमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. परंतु त्यानंतर मात्र...

सैफ अली खानला धक्का! सरकारचा मोठा निर्णय

मुंबई । नगर सहयाद्री:- सैफ अली खान याच्या भोपाळमधील पतौडी घराण्याची मालमत्ता उच्च न्यायालयानं...