spot_img
अहमदनगरकृषिकन्या श्रद्धा ढवणला राष्ट्रीय गोपाळ रत्न पुरस्कार

कृषिकन्या श्रद्धा ढवणला राष्ट्रीय गोपाळ रत्न पुरस्कार

spot_img

उत्कृष्ट दुग्ध उत्पादन व आधुनिक व्यवस्थापनाची देशपातळीवर दखल
पारनेर : नगर सह्याद्री
केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागातर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा “राष्ट्रीय गोपाळ रत्न–२०२५” पुरस्कार जाहीर झाला असून राज्यातील दोन निवडलेल्या पशुपालकांपैकी अहिल्यानगर जिल्ह्यातील निघोज (ता. पारनेर) येथील श्रद्धा ढवण यांची राष्ट्रीय स्तरावर तृतीय क्रमांकासाठी निवड झाली आहे. देशी गाई–म्हशींचे संगोपन, उत्कृष्ट दुग्ध उत्पादन आणि शाश्वत व्यवस्थापन पद्धतींच्या यशस्वी अवलंबामुळे त्यांना हा मानाचा सन्मान मिळत आहे.

या पुरस्काराचे वितरण २६ नोव्हेंबर, दुग्ध दिनानिमित्त, केंद्रीय पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंह तसेच राज्यमंत्री एम. पी. सिंह बघेल यांच्या हस्ते होणार आहे.

श्रद्धा ढवण यांच्या निवडीबद्दल जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी त्यांचा गौरव करून अभिनंदन केले. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. उमेश पाटील, सहाय्यक आयुक्त डॉ. संतोष पालवे, डॉ. दशरथ दिघे, डॉ. मुकुंद राजळे, डॉ. सोपान नांदे यांसह विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
दूध भेसळीच्या वाढत्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर श्रद्धा ढवण म्हणाल्या,“जे दूध मी स्वतः पिऊ शकेन, तेच ग्राहकांना देईन,” अशा निर्धाराने त्या स्वच्छ, शुद्ध आणि आरोग्यदायी दूधनिर्मिती करतात.जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आधुनिक व्यवस्थापन, कमी संप्रेरक–प्रतिजैवकांचा वापर, पशुधनासाठी अनुकूल वातावरण आणि थेट विक्री या तत्त्वांचा अवलंब केला असून दूध थेट विक्री केंद्रांद्वारे ग्राहकाशी जोडले जाते.

श्रद्धा ढवण यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विभागाचे सचिव डॉ. रामस्वामी, आयुक्त प्रवीणकुमार देवरे, तसेच प्रादेशिक पशुसंवर्धन सहायुक्त बी. आर. नरबाडे यांनी अभिनंदन करून गौरव व्यक्त केला आहे.

परंपरेतून आधुनिकतेकडे वाटचाल
“वडिलोपार्जित दुग्ध व्यवसायास आधुनिक तंत्रज्ञान, मूल्यवर्धन व दुग्ध प्रक्रिया उपक्रमांची सांगड घातल्याने व्यवसाय अधिक शाश्वत व फायदेशीर झाला. दोन म्हशींपासून सुरुवात करून आज त्या ६९ म्हशींचे संगोपन करत आहोत. “स्वच्छ दूध निर्मिती” हा हेतू जपत त्यांनी बायोगॅस निर्मिती व दुग्धजन्य पदार्थ उत्पादनाद्वारे व्यवसायाला बहुविधता दिली आहे.
श्रद्धा ढवण ( कृषिकन्या)

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महापालिकेची राज्यात पाचव्या क्रमांकावर झेप; काय घडलं पहा…

सर्वसामान्य नागरिकांना चांगल्या आरोग्य सेवा देण्यासाठी लवकरच रुग्णालय सुरू होणार : आयुक्त तथा प्रशासक...

दुहेरी हत्याकांड! एकाच घरातील दोन सुनांची हत्या, नेमकं प्रकरण काय ?

नांदेड / नगर सह्याद्री - नांदेडमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील एका शेतात दोन...

अहिल्यानगरमध्ये पंचायत समितीच्या आरोग्य विभागात मोठा अपहार; असा झाला घोटाळा उघड…

अकोले | नगर सह्याद्री - अकोले पंचायत समितीच्या मवेशी, ब्राम्हणवाडा, शेंडी प्राथमिक आरोग्य केंद्रात...

संगमनेरमध्ये गुंडगिरी, शहराची विस्कटलेली घडी सुरळीत करणार; आमदार तांबे काय म्हणाले पहा

बाळासाहेब थोरात नेतृत्वात सेवा समिती संगमनेरच्या विकासासाठी कटिबद्ध आमदार सत्यजित तांबे | शहराची विस्कटलेली...