spot_img
महाराष्ट्रसामूहिक आत्महत्येने नाशिक हादरले, ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने २ मुलांसह विहिरीत मारली उडी

सामूहिक आत्महत्येने नाशिक हादरले, ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने २ मुलांसह विहिरीत मारली उडी

spot_img

नाशिक / नगर सह्याद्री –
नाशिकमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने दोन मुलांसह सामूहिक आत्महत्या केल्याची घटना समोर आली. नाशिकच्या चांदवड तालुक्यातील काजी सांगवी शिवारात ही घटना घडली. दिघवद येथील ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने दोन मुलांसह विहिरीत उडी घेत आयुष्य संपवलं. या घटनेमुळे नाशिक हादरले आहे. घटनेची माहिती मिळताच चांदवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.

नाशिकच्या चांदवड तालुक्यातील काजी सांगवी दिग्वद परिसरातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने आज टोकाचे पाऊल उचलले. या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने दोन मुलांसह आत्महत्या केली. सचिन हिरे असं या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचे नाव होते. त्यांनी प्रज्ञा सचिन हिरे (१० वर्षे) आणि प्रज्वल सचिन हिरे (४ वर्षे) या दोन मुलांसह विहीरीत उडी घेत आत्मह्या केली. घराजवळील विहिरीत त्यांनी आयु्ष्याचा शेवट केला.

तिघांनी विहिरीत उडे घेत आत्महत्या केल्याची घटना कुटुंबाला समजताच खळबळ उडाली. तिघांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यासाठी चांदवडच्या रायपूर येथील स्कुबा ड्रायवरला बोलवण्यात आले होते. विहिरीत प्रचंड पाणी आणि गाळ होता. त्यामुळे बऱ्याच तासांच्या अथक प्रयत्नानंतर तिघांचे मृतदेह विहिरीमधून बाहेर काढण्यात आले. हे मृतदेह चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात पोस्टमार्टम करण्यासाठी पाठवण्यात आले आहेत. सदर घटना ही कौटुंबीक वादातून झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. चांदवड पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मनपाच्या मतदार यादीत २० हजार नावांची हेराफेरी; कोण काय म्हणाले पहा

दोषींवर गुन्हा दाखल करण्याची नितीन भुतारे यांची मागणी अहिल्यानगर / नगर सह्याद्री - अहिल्यानगर महानगरपालिकेने...

शहरात संविधान गौरव दिन उत्साहात साजरा; संविधानाच्या उपदेशकेचे सामूहिक पठन

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- आंबेडकरी समाजाच्या वतीने संविधान गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात...

जगात भारतीय संविधान सर्वश्रेष्ठ: पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

लोणी । नगर सहयाद्री:- संविधानाने देशातील प्रत्येक माणसाला स्वातंत्र्य, समता, बंधूता आणि न्यायाचा मंत्र...

अर्ध्या तासात नवरी झाली विधवा, लग्न सोहळ्यात नेमकं काय घडलं?

अमरावती । नगर सहयाद्री:- अमरावती मधील वरुड तालुक्यातील पुसला गावात आनंदाचा लग्नसोहळा काही क्षणातच...