spot_img
राजकारणनरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार, भाजप 'इतक्या' जागा जिंकेल? गुरु रामभद्राचार्यांच्या भविष्यवाणीची...

नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार, भाजप ‘इतक्या’ जागा जिंकेल? गुरु रामभद्राचार्यांच्या भविष्यवाणीची सर्वत्र चर्चा

spot_img

अयोध्या / नगर सह्याद्री : लोकसभेची निवडणूक आता तोंडावर येऊन ठेपली आहे. राजकीय पक्षांनी सभा, भेटीगाठी, रॅली आदी गोष्टी सुरु केल्या आहेत. कोण किती जागा जिंकू शकते याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. दरम्यान आता अध्यात्मिक गुरु रामभद्राचार्य यांनी वर्तवलेल्या अंदाजाने जोरदार चर्चा सर्वत्र सुरु झाली आहे.

2024 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी सहज जिंकतील. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला 350 पेक्षा जास्त जागा मिळतील, असा दावा त्यांनी केलाय. अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्यात देशातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती सहभागी झाल्या होत्या.

यामध्ये गुरू रामभद्राचार्य देखील सहभागी झाले होते. रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर गुरु रामभद्राचार्य भावुक झालेले दिसले. अभिषेक झाल्यानंतर गुरु रामभद्राचार्य यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप प्रचंड बहुमताने सरकार स्थापन करेल, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.

ते म्हणाले, मोदींना आमचा आशीर्वाद आहे, ते सदैव प्रसन्न राहतील. गुरु रामभद्राचार्य यांनी याआधी नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होती अशी भविष्यवाणी केली आहे. एबीपी न्यूज आणि सी व्होटरने डिसेंबर महिन्यात केलेल्या सर्वेमध्ये देखील भाजप पुन्हा सरकार स्थापन करेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...

मनपाचे दोन कर्मचारी निलंबित; कारण आलं समोर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- महापालिकेच्या मार्केट विभागातील कथित हप्तेखोरीच्या समाजमाध्यमातून प्रसारित झालेल्या ध्वनिफितीसंदर्भात आयुक्त तथा...