spot_img
ब्रेकिंग“नामदेव शास्त्रींनी माफी मागावी अन्यथा…”, राष्ट्रवादी शरद पवार गटाचा इशारा

“नामदेव शास्त्रींनी माफी मागावी अन्यथा…”, राष्ट्रवादी शरद पवार गटाचा इशारा

spot_img

पुणे / नगर सह्याद्री –
‘भगवानगडाचे महंत ह. भ. प. नामदेव महाराज शास्त्री यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरण, खंडणी आणि वाल्मीक कराड गँगशी संबंध यावरून अडचणीत आलेले मंत्री धनंजय मुंडे यांची पाठराखण करणारी भूमिका मांडली असून, ही बाब सगळ्या वारकरी संप्रदायासाठी लाजिरवाणी आहे. त्यांनी याबाबत लवकरात लवकर वारकरी संप्रदायाची माफी न मागितल्यास राज्यभरात आंदोलन करू,’ असा इशारा राष्ट्रवादी (शरद पवार) वारकरी आघाडीचे राज्यप्रमुख हभप विठ्ठल आबा मोरे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिला.

‘संतोष देशमुख यांची हत्या ज्यांनी केली त्यांची मानसिकता अशी का बनली हे देखील पाहिले पाहिजे, असे विधान नामदेव शास्त्री यांनी केले होते. त्यावरून शास्त्री हत्येचे समर्थन करतात का? दोन समाजांना समोरासमोर लढा, असे सांगणे भगवानगडाच्या महंताला शोभते का,’ असा सवाल मोरे यांनी उपस्थित केला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

खासदार निलेश लंकेंना सुजित झावरे यांचा धक्का ; विश्वासू सहकारीच लावला गळाला

ढवळपुरी गटात राजकारण फिरणार पारनेर/ नगर सह्याद्री : सुजित झावरे पाटील यांनी दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ...

सेनापतींच्या विचारांची देशाची गरज : कवी इंद्रजीत भालेराव

  सेनापती बापट साहित्य संमेलनास सुरुवात सुनील चोभे / नगर सह्याद्री - सध्याच्या काळात एकूण राजकारणात आणि...

दिवसाढवळ्या महिलेचे ‘जेसीबी’ने पाडले घर तर तहसिलच्या आवारातून डंपर चोरणारे जेरबंद; वाचा अहिल्यानगर क्राईम..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- निंबोडी शिवारात एका महिला गृहिणीच्या घरावर दिवसाढवळ्या ‘जेसीबी’ फिरवल्याची घटना...

आरक्षित कोटा ठरला, आरक्षण सोडतीकडे लक्ष

34 जागांवर महिला आरक्षण | 18 जागांवर ओबीसींना संधी | 11 नोव्हेंबर रोजी सोडत अहिल्यानगर...