अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
अहिल्यानगर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात गणेशोत्सवाचा जल्लोष रंगू लागला आहे. बाप्पाच्या आगमनाला अवघे काही तास शिल्लक असताना शहरातील बाजारपेठा, चौक-चौकातील मंडळे, तसेच गावागावांमध्ये भक्तीभावाचे वातावरण निर्माण झाले आहे. गणपती बाप्पाच्या आगमनासाठी घराघरांत तयारी पूर्ण झाली असून बाजारपेठेत खरेदीसाठी प्रचंड गद पाहायला मिळत आहे.
अहिल्यानगर शहरातील बाजारपेठा, नालेगाव, स्टेशन रोड, सराफ बाजार परिसर, तसेच ग्रामीण भागातील मुख्य ठिकाणी गणेशमूतची दुकाने सजली आहेत. शाडूच्या गणपती मूतसोबतच पॉपच्या मूतनाही प्रचंड मागणी आहे. लहान मुलांसाठी विशेष डिझाईनचे गणपती, तसेच पर्यावरणपूरक शाडूच्या मूत या वषही नागरिकांच्या पसंतीस उतरल्या आहेत.
मूतच्या आकारमानानुसार किंमतीत विविधता दिसत असून 6 इंचांपासून 5 फूटांपर्यंतच्या मूत बाजारात उपलब्ध आहेत.
शहरातील प्रमुख गणेश मंडळांनी सजावटीच्या थीम्स, समाजोपयोगी संदेश, तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी तयारी सुरू केली आहे. बाप्पाच्या आगमनासाठी ढोल-ताशा पथकांनीही सरावाला सुरुवात केली आहे. अनेक मंडळांनी यावष पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संकल्प केला आहे.
सजावटीच्या साहित्याला मागणी, बाजार पेठेत गद
गणपती मंडप, थाटामाट, इलेक्ट्रिक लाईट्स, रंगीबेरंगी फुले, कापडी पडदे, थर्माकोलची सजावट, तसेच नवीन डिझाईनचे कृत्रिम फुलांचे हार, माळा, आणि शोभेच्या वस्तूंची बाजारात रेलचेल आहे. घरगुती मंडळे आणि सार्वजनिक मंडळांकडूनही सजावटीसाठी खरेदी मोठ्या प्रमाणावर होत आहे. बाप्पाच्या पूजेच्या साहित्याची खरेदी करण्यासाठी महिलांची आणि मुलांची विशेष गद आहे. मूत सजवण्यासाठीच्या छोट्या वस्तूंपासून ते अगरबत्ती, नैवेद्य साहित्य, सुकामेवा, पुजावस्तू यांना मोठी मागणी आहे. ग्रामीण भागातूनही नागरिक शहरात खरेदीसाठी येत असल्याने बाजारपेठा गजबजल्या आहेत.
पोलीस प्रशासन सज्ज
गणेशोत्सवात सुरक्षा व्यवस्थेसाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सुमारे तीन हजार पोलीसांचे हालचालींवर लक्ष राहणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रत्येक गल्ली-बोळात गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी भक्त मंडळी सज्ज झाली आहेत. गणपती बाप्पा मोरया!च्या गजराने शहर आणि गावं आगामी दिवसांत भक्तिमय वातावरणाने दुमदुमणार आहेत. दरम्यान जिल्ह्यातील अनेक गावांत एक गाव एक गणपती बसविला जाणार आहे.