spot_img
अहमदनगरजिल्हा ग्रामपंचायत अधिकारी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी नागरे; वाघ व्हाईस चेअरमन

जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी नागरे; वाघ व्हाईस चेअरमन

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री
अहिल्यानगर जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी सुनिल नागरे, व्हा.चेअरमनपदी सुनिल वाघ तर मानद सचिवपदी सविता भाकरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. सहकार विभागाचे अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी किरण आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत पदाधिकारी निवडी एकमताने करण्यात आल्या.

या निवडीनंतर नूतन चेअरमन सुनिल नागरे, व्हा.चेअरमन सुनिल वाघ, मानद सचिव सविता भाकरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संचालक सतिश मोटै, दिलीप नागरगोजे, शामराव भोसले, मंगेश पुंड, रूबाब पटेल, किसन भिंगारदे, उध्दव जाधोर, संदीप लगड, वाळू मुंढे, भगवान खेडकर, रामदास गोरे, सुरेश मंडलिक, नारायण खेडकर, अशोक खळेकर, भाऊसाहेब गायकवाड, तज्ज्ञ संचालक मधुकर जाधव, लक्ष्मण नागरे, ग्रामपंचायत अधिकारी युनियनचे जिल्हाध्यक्ष युवराज पाटील, सरचिटणीस अशोक नरसाळे, विभागीय सचिव राजेंद्र पावसे, कोषाध्यक्ष सुभाष गर्जे, कार्याध्यक्ष रवींद्र ताजणे, संस्थेचे व्यवस्थापक प्रदीप कल्याणकर, वरिष्ठ सहायक नफीसखान पठाण यांच्यासह जिल्हा संघटना पदाधिकारी, राज्य कौन्सिलर , तालुका अध्यक्ष – सचिव तसेच सभासद बांधव उपस्थित होते.

नूतन चेअरमन सुनिल नागरे म्हणाले, ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचे नेते एकनाथ ढाकणे यांनी 35 वर्षे संघटना व पतसंस्थेच्या उत्कर्षात महत्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्यारच नेतृत्वाखाली आदर्श कारभार करून पतसंस्थेने राज्यात नावलौकिक मिळवला. त्यांनी घालून दिलेल्या आदर्शानुसार सर्वांना सोबत घेवून पतसंस्थेची घोडदौड कायम राखण्याचा प्रयत्न राहिल. ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची कामधेनू असलेल्या पतसंस्थेच्या ठेवी वाढवून सभासद संख्या वाढविण्याच्या दृष्टीने आगामी काळात विशेष प्रयत्न केले जातील.

जिल्हाध्यक्ष युवराज पाटील म्हणाले की, सर्व सभासद, संघटना पदाधिकाऱ्यांच्या समन्वयातून पतसंस्थेची नूतन पदाधिकारी निवड बिनविरोध पार पडली आहे. पतसंस्था ग्रामसेवकांसाठी कामधेनू तसेच हक्काचा आर्थिक आधार आहे. पतसंस्थेकडून ठेवींवर आकर्षक व्याजदर दिला जातो. पतसंस्थेची आर्थिक प्रगती साधण्यासाठी येत्या काळात ठेवी वाढविणे तसेच संस्था स्वभांडवली करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जातील. सव संचालक मंडळ सभासदाभिमुख कारभार करून पतसंस्थेच्या नावलौकिकात भर घालतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. व्हा.चेअरमन सुनिल वाघ यांनी सर्वांना सोबत घेवून सभासदांच्या विश्वासाच्या पाठबळावर उत्कृष्ट कारभाराची परंपरा कायम राखण्याची ग्वाही देत सर्वांचे आभार मानले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

खासदार ओवैसींची सभा रद्द; माजी खासदार इम्तियाज जलील यांची माहिती, कधी होणार सभा?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहरात आज एआयएमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांची...

सीना नदीच्या पुराच्या संधीचा फायदा चोरट्यांनी घेतला; कुठे साधला डाव.., वाचा अहिल्यानगर क्राईम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील कल्याण रोड परिसरात मुसळधार पावसामुळे सीना नदीला आलेल्या पुराचा...

अवैध धंद्यांवर एलसीबीचा छापा; ३ लाखांचा मुद्देमालासह ३ आरोपी जेरबंद

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- कर्जत शहरातील भांडेवाडी परिसरातील अवैधरीत्या सुरु असलेल्ल्या गुटखाविक्री स्थानिक गुन्हे...

नवरात्र महोत्सव शक्ती आणि भक्तीचा संगम: डॉ. जयश्रीताई थोरात

अमृतवाहिनीत ‌‘अमृतरास‌’ गरबा उत्साहात | 2500 विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त सहभाग संगमनेर । नगर सहयाद्री:- शक्ती आणि...