spot_img
ब्रेकिंगनगर अर्बन बँक प्रकरण: ठेवीदारांसाठी महत्वाची अपडेट; ठेवी परत मिळणार?

नगर अर्बन बँक प्रकरण: ठेवीदारांसाठी महत्वाची अपडेट; ठेवी परत मिळणार?

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
अवसायानात निघालेल्या नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ठेवीदारांची प्रतिक्षा अखेर संपली असून प्रशासनाने यापूव घोषित केल्याप्रमाणे पाच लाखांपेक्षा जास्त रकमेची ठेव पावती असलेल्या ठेवीदारांना ठेव पावतीच्या 50% रक्कम थेट ठेवीदारांच्या खात्यात आज पासून (सोमवार) वर्ग होणार असल्याची माहिती बँकेचे अवसायक गणेश गायकवाड यांनी दिली.

डी आय सी जी सी कार्यालयाकडून सदरचे ना हरकत प्रमाणपत्र बँक प्रशासनास प्राप्त झाल्यामुळे पाच लाखांपेक्षा जास्त ठेव रक्कम असलेल्या व विहित नमुन्यातील क्लेम फॉर्म व केवायसी अपडेट केलेल्या 1926 ठेवीदारांना ठेव पावतीच्या 50% इतकी रक्कम आज पासून शाखानिहाय संबंधित ठेवीदारांनी दिलेल्या बँक खात्यात आजपासून जमा करण्यात येणार आहेत.

त्यामुळे आता नगर अर्बनच्या ठेवीदारांसाठी ही मोठी दिलासादायक घडामोड मानली जात आहे. पैसे पुन्हा मिळण्यास सुरवात होणार असल्याने ठेवीदारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी! अजित पवारांचा स्वबळाचा इशारा…

पुणे / नगर सह्याद्री - राज्यात सध्या महायुतीचं सरकार असलं तरी स्थानिक निवडणुकीत सर्व पक्ष...

मनोज जरांगेंचा सरकारला अल्टीमेटम; बैठक निष्फळ, प्रमाणपत्र द्यावं लगेच आंदोलन सोडेन… राज्यात काय काय घडलं पहा

मुंबई | नगर सह्याद्री Maratha Reservation Row: आरक्षणाबाबत काम करणाऱ्या शिंदे समितीनं ६ महिन्यापासून...

मनोज जरांगे हा पवारांचा सुसाईड बॉम्ब; भाजप आमदार काय म्हणाले पहा

मुंबई / नगर सह्याद्री : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागण्यासाठीच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे....

चिचोंडीला कांदा मार्केट सुरु करण्याचा मानस: आ. कर्डिले

नेप्ती उपबाजार भव्य कांदा शेडचे भूमिपूजन अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नेप्ती उपबाजारची जागा कमी पडत...