पुणे । नगर सहयाद्री:-
बहुप्रतीक्षित पुणे-अहिल्यानगर नवीन रेल्वे मार्ग लवकरच प्रत्यक्षात उतरणार आहे. याबाबत सविस्तर प्रकल्प अहवाल रेल्वे बोर्डाकडे देण्यात आला असून हा नवीन रेल्वे मार्ग पुणे-अहिल्यानगर महामार्गाच्या बाजूनेच असेल अशी माहिती समजली आहे.
नवा मार्ग झाल्यास आताच्या तुलनेत 38 किलोमीटर अंतर वाचेल. नवीन रेल्वे मार्गामुळे दीड ते पावणेदोन तासांतच पुण्याहून अहिल्यानगरला येते येणार आहे. रांजणगाव, सुपा येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची (एमआयडीसी) केंद्रे असल्याने औद्योगिक विकासाला चालना मिळेल असे म्हटले आहे.
नव्या मार्गासाठी सुमारे 11 हजार कोटी रुपये खर्च येण्याचा अंदाज आहे. सध्याच्या रेल्वे मार्गाचे अंतर सुमारे 154 किलोमीटर आहे. नवीन रेल्वे मार्गाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून प्रवाशांची मागणी होती. त्यादृष्टीने मध्य रेल्वेच्या बांधकाम विभागाने सर्वेक्षण करून काही दिवसांपूव डीपीआरफ सादर केला. यात हा मार्ग होणे प्रवासी आणि रेल्वेच्याही दृष्टिकोनातून फायदेशीर असल्याचे नमूद केले आहे.
असा असेल मार्ग
पुणे-वाघोली-शिक्रापूर-रांजणगाव-शिरूर-कारेगाव-सुपा-चास-केडगाव-अहिल्यानगर असा हा मार्ग असेल. रेल्वेमार्गाची 116 किमी लांबी असून 11 स्थानके असतील.