spot_img
अहमदनगरविजय औटींच्या विरोधात नगरपंचायतची पोलिसात तक्रार, नेमकं प्रकरण काय?

विजय औटींच्या विरोधात नगरपंचायतची पोलिसात तक्रार, नेमकं प्रकरण काय?

spot_img

पारनेर । नगर सहयाद्री
माजी नगराध्यक्ष विजय सदाशिव औटी व अन्य तिघांनी पारनेर नगरपंचायतच्या रजिस्टरला ३५ दुकाने व २५ फ्लॅटची खोटी नोंद लावून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे पारनेर नगरपंचायतने विजय औटी विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

विजय औटी, संभाजी बबनराव मगर, विजया भागाची नवले यांनी या नोंदी लावून बनावट दस्त तयार केले आहेत. या संदर्भात नगरपंचायतच्या मुख्याधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांना पत्र दिले आहे. पत्रात म्हटले आहे की, पारनेर नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या गट क्रमांक ३९०३, ३५५४/१। ३५४०/१ व ३५४४/२ मिळकत नं. २५९४/२५९५/२५९६ या मिळकतींची स्थळ पाहणी केली असता त्या मिळकतीवर भैरवी अपार्टमेंट नावाची इमारत अस्तित्वात नाही.

मात्र नगरपंचायत मागणी रजिस्टर तथा नमुना नं. ८ वर भैरवी अपार्टमेंट असा उल्लेख करून त्यावर एकूण ३५ शॉप व केली २५ फ्लॅटची बेकायदेशीर नोंद आढळली आहे. सदर नोंद दुय्यम निबंधक यांच्याकडील दस्त ५७१७/२०१५ सुची क्रमांक २ व अर्जावरून नगरपंचायत दप्तरी घेतल्याचे सिद्ध होत आहे. शॉप व फ्लॅट नसतानाही नगरपंचायत प्रशासनाकडे खोटा अर्ज करून बनावट कागदपत्रांच्या आधारे खोट्या नोंदी लावून काहीतरी हेतू साध्य करण्याचा संबंधिताचा प्रयत्न दिसतो असे म्हंटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

प्रतीक्षा संपली! महाराष्ट्र मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर, कोणाला कोणते खाते मिळाले, पहा संपूर्ण यादी

मुंबई / नगर सह्याद्री - Maharashtra Portfolio Allocation : मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर खाते वाटप...

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...