spot_img
अहमदनगरवेश्या व्यवसायाच भांड फुटलं! नगर-मनमाड मार्गावरील 'या' हॉटेलमध्ये कुंटणखाना, पोलिसांनी धाड टाकताच…

वेश्या व्यवसायाच भांड फुटलं! नगर-मनमाड मार्गावरील ‘या’ हॉटेलमध्ये कुंटणखाना, पोलिसांनी धाड टाकताच…

spot_img
अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- 
अहिल्यानगर-मनमाड रोडवरील शिंगवेनाईक परिसरातील एका हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय चालविल्याचे उघडकीस आले असून, स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रविवारी (18 मे) सायंकाळी छापा टाकून दोन महिलांची सुटका केली. या कारवाईत दीपक भाऊसाहेब साळवे (वय 30 रा. शिंगवेनाईक) याला अटक करण्यात आली आहे. तर बल्ली उर्फ बाबासाहेब साळवे (रा. शिंगवेनाईक) हा पसार झाला आहे.
मनमाड रस्त्यावरील शिंगवेनाईक शिवारात दोस्ती हॉटेलमध्ये कुंटणखाना सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली एका पथकाने पंचासमक्ष रविवारी सायंकाळी हॉटेल दोस्तीच्या मागील खोलीत छापा टाकला. या कारवाईत महिलांना देहव्यवसायासाठी खोली उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे आढळले. पोलिसांनी दोन महिलांची सुटका करत दोघांविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
घटनास्थळावरून मोबाईल, रोख रक्कम व इतर साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आहेर, तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी व गुन्हे शाखेच्या पोलीस अंमलदारांनी ही कारवाई केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

गरोदर महिलेवर जंगलात अत्याचार; दोघा नराधमाचं संतापजनक कृत्य!

Maharashtra Crime News: एक हादरवणारी घटना समोर आली आहे. रात्रीच्या सुमारास घरात घुसून परिवाराला...

४ टक्के व्याजदरात ५ लाखाचे कर्ज; बळीराजासाठी सरकारची योजना?, वाचा सविस्तर

Kisan Credit Card Scheme: केंद्र सरकारने देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक योजना पुढे आणली आहे....

नगरमध्ये चाललंय काय?, जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांवर कारवाई

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना, वैद्यकीय व्यावसायिक नसताना दवाखाना चालवून, रूग्णांवर...

आजचे राशी भविष्य! महिन्यातील उत्तम दिन, ‘या’ राशीच्या जीवनात मोठे बदल घडणार

मुंबई। नगर सह्याद्री मेष राशी तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यास लाभदायक दिवस. आर्थिक पक्ष मजबूत होण्याची...