spot_img
अहमदनगरनगर पुन्हा चर्चेत; वेश्या व्यवसायावर छापा, ३ महिलांची सुटका अन् दोघांना अटक

नगर पुन्हा चर्चेत; वेश्या व्यवसायावर छापा, ३ महिलांची सुटका अन् दोघांना अटक

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री
खंडाळा (ता. अहिल्यानगर) येथील हॉटेल राजयोग येथे सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून दोघांना पकडले असून, तीन महिलांची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय अनिल कर्डिले (वय २८, रा. खंडाळा) हा हॉटेल राजयोग येथे महिलांकरवी कुंटणखाना चालवत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती.

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे, पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलीस अंमलदार गणेश धोत्रे, अरूण गांगुर्डे, संतोष खैरे, रवींद्र घुंगासे, भगवान थोरात, सारिका दरेकर व उमाकांत गावडे यांच्या पथकाने सदर ठिकाणी जावून बनावट ग्राहक पाठवून वेश्याव्यवसाय सुरू असल्याची खात्री घेतली. त्यानंतर पंचासमक्ष छापा टाकण्यात आला.

कारवाईदरम्यान, नारायण ठाणप्रसाद भट्टराई (वय २७, रा. कोहलपूर, बाके, नेपाळ) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक हजार ५०० रूपये रोख रक्कम जप्त करण्यात आले. हॉटेलमधील तपासणीत तिन्ही महिलांची सुटका झाली असून, त्यांनी अक्षय कर्डिले याने वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडल्याचे सांगितले. या कारवाईत अक्षय कर्डिले यालाही ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून एक लाख रूपये किंमतीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. दोघांविरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पावसामुळे नुकसान झालेल्या केडगाव अमरधाम, आंबेडकर भवनाची आयुक्तांकडून पाहणी

पडलेल्या भिंती बांधण्याचे काम तत्काळ सुरू करा : आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे अहिल्यानगर ।...

मनपा, झेडपी निवडणुकांसाठी रणशिंग फुंकले!, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेनेकडून जोर बैठका..

सुनील चोभे | नगर सह्याद्री आगामी दोन-तीन महिन्यांत होऊ घातलेल्या महापालिका, नगर पंचायती, नगर परिषदा,...

ठाकरे ब्रँड बुडाला! आदित्य ठाकरेंचा पावसाळा आता कारागृहात?; मंत्री नितेश राणेंचे खळबळजनक वक्तव्य…

Politics News: राज्याचे मंत्री आणि भाजप नेते नितेश राणे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून...

शहरासह जिल्ह्यात बकरी ईद उत्साहात साजरी; शांतता व सामाजिक सलोख्यासाठी प्रार्थना

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरासह जिल्ह्यात मुस्लिम समाज बांधवांनी बकरी ईद (ईद उल अजहा) शनिवारी...