spot_img
अहमदनगरनगर ब्रेकिंग! कामरगाव शिवारात बिबट्या ठार

नगर ब्रेकिंग! कामरगाव शिवारात बिबट्या ठार

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
अहिल्यानगर–पुणे महामार्गावरिल कामरगाव शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत नर जातीचा बिबट्या ठार झाला.कामरगाव शिवारातील काळ्याच्या डोंगराकडून रस्ता ओलांडत असताना बिबट्याला धक्का लागला, त्यानंतर तो रस्ता पार करून रस्त्याच्या कडे निपचित पडला. ही माहिती नवनाथ ठोकळ यांनी सामाजिक कार्यकर्ते तुकाराम कातोरे यांना दिली, त्यांनी तत्काळ घटनेची माहिती वन विभागाच्या अधिकार्यांना कळवली.

माहिती मिळताच वन परिक्षेत्र अधिकारी अविनाथ तेलोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल शैलेश बडदे, वनरक्षक कृष्णा गायकवाड आणि वन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून बिबट्याला ताब्यात घेतले व पुढील कार्यवाहीसाठी वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या कार्यालयाकडे सुपूर्द केले आहे.

यावेळी अहिल्यानगर–पुणे महामार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांनी वाहने थांबवून मोठी गर्दी केली होती. मागील काही दिवसापासून या भागात बिबट्यांचा सतत वावर होत असल्याचे नागरिकांनी सांगितले. वन विभागाने शेतकरी आणि जनावरे चारणारे नागरिक यांना काळजी घेन्याचे आवाहन केले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आ. सत्यजीत तांबे यांची पत्रकार परिषद; संगमनेरकरांसाठी महत्वाची अपडेट..

संगमनेर । नगर सहयाद्री:- संगमनेर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, जनतेच्या थेट सहभागातून जाहीरनामा...

रेडबुल वाटून विकास होत नाही, तालुक्याची कामधेनू असलेला कारखाना विक्री करण्याची वेळ कोणी आणली?; पारनेर मध्ये मंत्री विखे पाटील कुणावर बरसले?

पारनेर । नगर सहयाद्री जाणत्या राजांनी जिल्हा दुष्काळमुक्त करण्याच्या फक्त वल्गना केल्या, मात्र प्रत्यक्षात निधी...

महाराष्ट्रात गारठा वाढला, ‘या’ जिल्ह्यात कडाक्याची थंडी, वाचा हवामान खात्याचा अंदाज

मुंबई । नगर सहयाद्री:- उत्तरेकडील थंड वारे राज्याच्या दिशेने वाहू लागल्याने गारठा वाढला आहे....

आजचे राशी भविष्य ! ‘या’ राशींच्या नशिबात दडलंय काय? वाचा सविस्तर

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य दिवसाच्या सुरवातीत तुम्हाला आज आर्थिक हानी होऊ शकते...