spot_img
ब्रेकिंगMaharashtra News: माय-लेकीने आयुष्य संपवलं! काळीज पिळवटून टाकणारी घटना कुठे घडली?

Maharashtra News: माय-लेकीने आयुष्य संपवलं! काळीज पिळवटून टाकणारी घटना कुठे घडली?

spot_img

Maharashtra News: एक काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. ईने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे समजताच मुलीनेही आयुष्य संपवल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. माय-लेकीच्या मृत्यूने गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. वंदना भरत दुधारे आणि पल्लवी भरत दुधारे असे या मायलेकींचे नाव आहे.

छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोर गावातील एका शेतात दुधारे कुटुंब वास्तव्यास होते. काल रात्री मुलगी पल्लवीने आईच्या हातावर मेहंदी काढली आणि सर्वजण झोपी गेले. सकाळी उठल्यावर आई न दिसल्याने पल्लवीने आसपास शोध घेतला. यावेळी नजिकच्याच विहिरीत तिला आईचा मृतदेह आढळून आला.

आईने आत्महत्या केल्याचा धक्का लेकीला सहन झाला नाही आणि तिनेही कोणताही विचार न करता स्वतः विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून माय-लेकीच्या आत्महत्येच्या घटनेने परिसर हादरुन गेला असून संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. याबाबतचा अधिक तपास करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

..आता दिल्लीनेही दखल घेतली पाहिजे, अशी तयारी करा; राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश

मुंबई । नगर सहयाद्री:- राज्यातील विरोधकांनी निवडणूक आयोगाच्याविरोधात आता एल्गार पुकारला आहे. विरोधकांनी रस्त्यावर उतरून...

संतापजनक! रुग्णवाहिकेत आशा वर्करसोबत भयंकर घडलं, रात्री परतताना चालकाने केलं असं काही..

Maharashtra Crime News : महिलांचा लैंगिक छळ, अत्याचाराच्या घटना अजूनही थांबत नाहीत. अशात सहकाऱ्याकडूनच...

हवामान खात्याची महत्वाची अपडेट, काय दिला इशारा?, वाचा सविस्तर

मुंबई । नगर सहयाद्री:- कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांत गेल्या दोन दिवसांपासून...

अहिल्यानगर जिल्ह्यात राजकीय उलथापालथ; नगराध्यक्षपदासाठी जोरदार लढती! ‘या’ पक्षाचा ‌‘स्वबळाचा नारा‌’

श्रीगोंदा । नगर सहयाद्री: श्रीगोंदा तालुक्यात सध्या राजकीय हालचालींना वेग आला असून विविध पक्ष...