spot_img
अहमदनगर"मुझको पहेचानलो मैं हूँ डॉन...."; संगमनेरच्या मैदानावर सुजय विखेंचा नादखुळा डान्स!

“मुझको पहेचानलो मैं हूँ डॉन….”; संगमनेरच्या मैदानावर सुजय विखेंचा नादखुळा डान्स!

spot_img

Sujay Vikhe-Patil : संगमनेर शहरातील बाळासाहेब थोरात यांच्या घराशेजारील मैदानावर जनसेवा फाऊंडेशनच्या वतीने महिलांसाठी हळदी कुंकू व खेळ पैठणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला हजारो महिलांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमामध्ये महिलांसाठी मनोरंजनाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमानिमित्ताने सुजय विखे आणि आमदार अमो खताळ एकत्र आले होते. यावेळी माजी खासदार सुजय विखे यांनी ‘मुझको पहेचानलो मैं हूँ डॉन’ गाण्यावर जबरदस्त डान्स केला. सुजय विखे यांचे हे टायमिंग अन् डान्स करण्यासाठी निवडलेल्या गाण्यावरून संगमनेरमध्ये चर्चा रंगली आहे.भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनी ‘मैं हूँ डॉन’ या गाण्यावर ठेका धरला. विखे यांचा हा ठेका जणू काही थोरातांना खिजवण्याचा प्रयत्नच होता.

विखे अन् थोरात यांच्यातील राजकीय वैर वेगळ्याच पातळीवर पोचलं आहे. विखे हे थोरात यांना डिवचण्याची कोणतीही संधी सोडत नाही. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर हा राजकीय संघर्ष अधिकच वाढला आहे. बाळासाहेब थोरात यांना पराभूत करण्यासाठी सुजय विखे यांनी संगमनेर मतदारसंघात अनेक सभा घेत, अमोल खताळ यांना ताकद दिली होती.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

जी. एस. महानगर बँक निवडणुकीचा बिगुल लवकरच वाजणार, मोठी माहिती समोर..

पारनेर | नगर सह्याद्री जी एस महानगर बँकेची निवडणूक लवकरच होणार असून यासाठी मतदारांची नवीन...

मनपाचे 1680 कोटींचे बजेट मंजूर

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर महानगरपालिकेचा सन 2024-2025 चा सुधारीत व सन 2025-2026 चा मूळ...

स्मशानभूमी परिसरात थाटला ‘ऑक्सिजन पार्क‌‌‌’; नगर जिल्ह्यातील ‘या’ गावाची चर्चा!

वृक्षप्रेमी रसाळ बंधु यांचे कार्य कौतुकास्पद: आमदार काशिनाथ दाते पारनेर । नगर सहयाद्री:- निसर्गाच्या सान्निध्यात वृक्ष...

भैय्या! सुरुवात करतोय, आशीर्वाद असू द्या; किरण काळे पुन्हा शिवसेना मजबूत करणार

अहिल्यानगर। नगर सहयाद्री:- शिवसेनेचे दिवंगत नेते माजी मंत्री अनिल भैय्या राठोड यांनी आयरनजर शहरांमध्ये...