नगर सह्याद्री टीम : Mutual fund : आजकाल बहुतांश लोक गुंतवणुकीबाबत सतर्क झाले आहेत. शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) बनवण्याचा ट्रेंड झपाट्याने वाढत आहे. सन 2023 मध्ये, एसआयपीचे आकडे विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत.
अलीकडच्या काळात शेअर बाजारात नवे रेकॉर्ड बनवल्यानंतर एसआयपीने देखील वर्षभरात बंपर परतावा दिला आहे. येथे तुम्हाला टॉप SIP बद्दल माहिती देणार आहोत की ज्याने 2023 मध्ये 58% पेक्षा जास्त रिटर्न दिलाय.
– बंधन स्मॉल कॅप फंड हे रिटर्न देण्याच्या बाबतीत टॉपवर आहे. या फंडाने 2023 मध्ये 70.06 टक्क्यांहून अधिक रिटर्न दिला आहे.
– महिंद्रा मॅन्युलाइफ स्मॉल कॅप फंडने देखील जास्त रिटर्न दिला आहे. गुंतवणूकदारांना सुमारे 69.78% परतावा मिळाला आहे.
– ITI स्मॉल कॅप फंडाने 65.51% परतावा दिला आहे.
– निप्पॉन इंडिया ग्रोथ फंड आणि फ्रँकलिन इंडिया स्मॉलर कंपनीज फंड यांनी सुमारे 63% परतावा दिला आहे.
– HSBC मल्टी कॅप फंडाने 61.16 टक्के रिटर्न दिले आहेत.
– क्वांट स्मॉल कॅप फंड मध्ये 59.49% रिटर्न मिळाले आहेत.
– निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप फंड आणि जेएम व्हॅल्यू फंडने सुमारे 58% रिटर्न दिले आहेत.